लिफ्टमध्ये ‘तिला’ पाहिलं अन् रामगोपाल वर्मा फिदाच झाले, थेट सिनेमात दिला लीड रोल


आज अभिनेत्री अनिका सोटी तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. १४ जानेवारी १९९१ साली उत्तरप्रदेशच्या लखनऊ मध्ये तिचा जन्म झाला. अनिका जरी लखनऊची असली तरी तिने तिचे चित्रपट क्षेत्रातील करियर दाक्षिणात्य सृष्टीत केले.

अनिकाने २०१३ साली आलेल्या राम गोपाळ वर्मा यांच्या ‘ सत्या २’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. मात्र त्यानंतर तिने बॉलिवूडला अवलिदा म्हणत, तामिळ इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१४ सालापासून आजपर्यंत तिचे चार सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. शिवाय तिच्या हातात अजून दोन चित्रपट आहे जे ह्यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

अनिकाच्या जन्मानंतर तिचे संपूर्ण कुटुंब लखनऊहून हॉन्गकॉन्गला शिफ्ट झाले. चार वर्ष तिथे राहिल्यानंतर पुन्हा ते हॉन्गकॉन्गवरून मुंबईला शिफ्ट झाले. यादरम्यान ती तिचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मलेशियाला जाणार होती, मात्र त्याआधीच मुंबईत असतांना एका बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये तिला रिम गोपाल वर्मा यांनी पाहिले. पाहताक्षणीच त्यांना अनिका खूप आवडली आणि त्यांनी तिला एक चित्रपट ऑफर केला. हा सिनेमा म्हणजे ‘सत्या २’.

सुरुवातीला अनिकाने चित्रपट आणि अभिनय यात फारशी रुची दाखवली नाही. तिने राम गोपाल वर्मा यांना या सिनेमासाठी नकार दिला. पण वर्मा यांनी पुन्हा तिच्याशी कॉन्टॅक्ट केला. तेव्हा ती चित्रपटाला हो म्हणाली. सत्या २ चित्रपटानंतर अनिका कोणत्याही हिंदी सिनेमात दिसली नाही. तिने तिचा मोर्चा तामिळ चित्रपटाकडे वळवला.

अनिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत संवादही साधत असते.


Leave A Reply

Your email address will not be published.