Tuesday, April 23, 2024

‘सोनपरी’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन! मृणाल कुलकर्णीबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीयेत का?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्ध मिळवली आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन विश्वामध्ये आपली स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. मृणाल यांचा जन्म 21 जून1971 रोजी पुण्यात झाला आहे. मृणाल यांनी त्यांच्या शिक्षणाची सुरूवात पुण्यातून केले आहे.

मृणाल यांनी बालपणीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. स्वामी ही त्यांची पहिली मालिका आहे. त्या मालिकेत मृणाल यांनी माधवराव पेशवे यांची पत्नी रमाबाई यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला खूप पसंती मिळाली. ही मालिका दूरदर्शवरून प्रसारित व्हायची आणि त्यावेळी हि मालिका हिट ठरली. ही मालिका आणि त्यातील सर्व पात्र प्रचंड लोकप्रिय झाले होते. स्वामी मालिकेत काम करताना मृणाल अवघ्या 16 वर्षांच्या होत्या. त्यांना आजही ‘सोनपरी’ या नावानेच ओळखली जाते.

तुम्हाला माहित आहे का की मृणाल यांना लहानपणापासून अभिनयात अजिबात रस नव्हता. त्यांना शिक्षण पुर्ण करायचे होते. त्यामुळे त्यांनी अनेक ऑफर नाकारल्या होत्या. मात्र, 1994 मध्ये त्यांनी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मृणाल यांचं 19 व्या वर्षी रुचिर कुलकर्णी यांच्याशी 10 जून 1990 मध्ये लग्न झालं. मृणाल यांचे पती रुचिर हे पेशानं वकील आहेत.

मृणाल यांच्याविषयी बोलायच झाल तर, ‘श्रीकांत’, ‘द ग्रेट मराठा’, ‘द्रौपदी’, ‘हसरत’, ‘मीराबाई’, ‘टीचर’, ‘स्पर्श’ आणि ‘सोनपरी’ यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे. त्या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने जाहिरातीमध्ये देखील काम केले आहे. मृणाल यांनी ‘जमाल हो जमाल’, ‘घरवाह’, ‘लेकरू’, थांग, ‘जोडीदार’ आदी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. तर ‘कमलाचा ​​मृत्यू’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘वीर सावरकर’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘आशिक’, ‘मेड इन चायना’ आणि ‘राम गोपाल वर्मा की आग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या. (Know special things about ‘Sonepari’ fame actress Mrinal Kulkarni’s birthday)

अधिक वाचा- 
सई ताम्हणकर स्पेनमध्ये फिरतेय ‘या’ व्यक्तीसोबत; दोघांचा खास फोटो तुफान व्हायरल…
‘आदिपुरुष’मधील डायलाॅगवरुन होणाऱ्या टीकेवर तेजस्विनी पंडितने सोडल मौन, म्हणाली, “वाद निर्माण करण्यासाठी…”

हे देखील वाचा