सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात तर प्रत्येक व्यक्तीसाठी हे माध्यम श्वास घेण्याइतके महत्वाचे झाले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियाचा वापर मनोरंजनविश्वात मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. कलाकार आणि फॅन्स यांच्यामधील दुवा आणि संपर्काचे महत्वाचे माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. या सोशल मीडियाचे महत्व लक्षात घेऊन अनेक जुने कलाकार देखील या माध्यमाच्या प्रेमात पडले आहे. सतत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात असतात. या सोशल मीडियाचा फायदा कलाकारांना स्वतःची प्रसिद्धी आणि लोकप्रियता वाढवण्यासोबतच कमाईचे दुसरे मध्यम म्हणून देखील केला जातो. आपल्या आवडत्या कलाकाराला सोशल मीडियावर फॉलो करत त्यांची प्रत्येक अपडेट नेटकरी घेत असतात. ज्या कलाकाराला सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोवर्स तो कलाकार सोशल मीडियावर प्रमोशनसाठी सर्वात जास्त पैसे चार्ज करतो. आज आपण जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांना सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोवर्स आहे.
विराट कोहली :
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली या यादीमध्ये सर्वातवर असून त्याला इंस्टाग्रामवर तब्ब्ल १९०२ कोटी फॉलोवर्स असून, विराटच्या प्रत्येक पोस्टची वाट हे सर्व बघत असतात.
प्रियांका चोप्रा :
आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड गाजवणाऱ्या प्रियांकाला सोशल मीडियावर ७. ६७५ कोटी फॉलोवर्स आहे.
नेहा कक्कर :
आपल्या आवाजाने सर्वानाच थिरकायला लावणाऱ्या नेहा कक्करची गाणी प्रदर्शित झाल्या झाल्या लोकप्रिय होतात. तिच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते. सोशल मीडियावरही हिट असणाऱ्या नेहाला इंस्टाग्रामवर ६.८४९ कोटी फॉलोवर्स आहे.
आलिया भट्ट :
आपल्या प्रभावी आणि जिवंत अभिनयाने प्रत्येक भूमिकेमध्ये जीव आणणारी अभिनेत्री म्हणून आलिया ओळखली जाते. बॉलिवूडची ही बबली गर्ल सोशल मीडियावरही तुफान गाजते. तिला ५.९४४ कोटी फॉलोवर्स आहे.
अक्षय कुमार :
आपल्या ऍक्शन आणि कॉमेडीमुळे एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या अक्षयला तुफान फॅन फॉलोविंग आहे. त्याचा प्रत्येक सिनेमा तुफाज गाजतो. अशातच सोशल मीडियावरही त्याने त्याचे वर्चस्व ठेवले आहे. त्याला ५.८६३ कोटी फॉलोवर्स आहे.
कपिल शर्मा :
कॉमेडी नाईट विथ कपिल शोमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या कपिलची लोकप्रियता तुफान आहे. आपल्या कॉमेडीने संपूर्ण जगात ओळख मिळवणाऱ्या कपिलची लोकप्रियता अमाप आहे. त्याला सोशल मीडियावर ३.८०४ कोटी फॉलोवर्स आहे.
तापसी पन्नू :
बॉलिवूडमधील प्रभावी अभिनेत्री म्हणून तापसी ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाने तिची एक वेगळी ओळख कमावली आहे. तिला १.९३१ कोटी इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत.
अल्लू अर्जुन :
आपल्या दमदार अभिनयाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच संपूर्ण जगात ओळख कमावलेल्या अल्लू अर्जुनला देखील इंस्टाग्रामवर १.५१४ कोटी फॉलोवर्स आहे.
करण जोहर :
बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक करण जोहर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे त्याला १.१४७ कोटी फॉलोवर्स आहे.
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- बॉलिवूड गायकांच्या आवाजाला टक्कर देतोय एका ट्रक ड्रायव्हरचा आवाज, पाहा हा व्हायरल व्हिडिओ
- ‘या’ कारणामुळे घरात बहिणीचे निधन झाले असताना जॉनी लिव्हर यांना करावा लागला होता स्टेज शो
- ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने शाहिद कपूरला प्रेमात दिला होता धोका, अभिनेत्याने स्वतः केला त्या दिवसांचा खुलासा