Thursday, June 1, 2023

Thor: Love and Thunder | मार्वल युनिव्हर्समध्ये नव्या व्हिलनची एन्ट्री, लूक पाहून सुटेल थरकाप!

मार्वलचा पुढील चित्रपट ‘थोर: लव्ह अँड थंडर’चा अधिकृत ट्रेलर मंगळवारी (२४ मे) रिलीझ झाला आहे. मार्वलचे चाहते खूप दिवसांपासून याची वाट पाहत होते. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’, ‘थोर’ (२०११), ‘थोर: द डार्क वर्ल्ड’ (२०१३) आणि ‘थोर: रॅगनारोक’ (२०१७) नंतर थोर फ्रँचायझीमधील हा चौथा चित्रपट आहे. यामध्ये ‘गौर द गॉड बुचर’ या खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता ख्रिश्चन बेल सध्या त्याच्या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ख्रिश्चन बेल हा हॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ऑस्कर पुरस्कार विजेता देखील आहे.

हाडाच्या सापळ्यासारखी पांढरी त्वचा आणि भयावह आवाजाचे गौर म्हणून ख्रिश्चन बेलचे पात्र हे ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील लॉर्ड वोल्डेमॉर्टची आठवण करून देते. भयावह दिसण्यासाठी निर्मात्यांनी अभिनेत्याचे डोळे गडद पिवळे केले आहेत. गौरचे हे रूप सीन्समध्ये सर्वात भयावहपणे तेव्हा दिसते, जेव्हा तो देवांविरुद्ध लढा घोषित करतो. (know who is the villain gorr in thor love and thunder)

ख्रिश्चन बेल हा हॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी वजन वाढवणे टाळले नाही किंवा वजन कमी करणेही टाळले नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी त्याने घेतलेली मेहनत त्याच्या प्रत्येक चित्रपटात दिसून येते. ‘अमेरिकन सायको’मुळे स्टारडम मिळवणारा हा अभिनेता ‘द मशिनिस्ट’, ‘बॅटमॅन बिगिन्स’, ‘द डार्क नाइट’, ‘द डार्क नाइट राइजेस’, ‘3:10 टू युमा’ आणि ‘टर्मिनेटर सॅल्व्हेशन’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे.

‘थोर’च्या चौथा भाग ‘थोर: लव्ह अँड थंडर’चा फर्स्ट लूक शेअर केल्यानंतर निर्मात्यांनी आता चित्रपटाचा पहिला ट्रेलर लॉन्च केला आहे. चित्रपटात, सर्वांचे संरक्षण करण्यासाठी थोर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परत आला आहे. या चित्रपटात भावनिक कनेक्‍शनसोबतच फुल ऍक्शनही पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा