Friday, March 29, 2024

पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सवर कोसळला दुखाःचा डोंगर, पोटातच मूल दगावल्याची दिली माहिती

प्रसिद्ध पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सवर (Britney Spears) दुखाःचा डोंगर कोसळला असून तिने शनिवारी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिने तिचे न जन्मलेले मूल गमावले असल्याचे सांगितले आहे. ब्रिटनी स्पीयर्सने गेल्या महिन्यातच तिच्या गर्भधारणेची घोषणा केली होती, परंतु आता तिने चाहत्यांना गर्भपाताची बातमी सांगणारी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांनाहीव मोठा धक्का बसला असून त्यांनी तिचे सांत्वन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्रिटनी स्पीयर्स ही जगभरात आपल्या पॉप गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या तिच्यावर दुखः चा डोंगर कोसळला असून तिचे मूल पोटातच दगावल्याचे वृत्त समोर आले आहे.  गायिका ब्रिटनी स्पीयर्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन याबद्दलची पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने “आम्हाला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, आमच्या गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीलाच आम्ही एक मूल गमावले आहे. हा क्षण कोणत्याही पालकांसाठी हृदयद्रावक असतो. प्रेग्नेंसीची बातमी जगाला सांगण्यासाठी आम्हीव थोडे थांबायला हवे होते. पण ही आनंदाची बातमी सांगण्यास आम्ही खूप उत्सुक होतो. एकमेकांवरील प्रेम हीच आमची ताकद आहे.” दोघांनी पुढे “आम्ही आमचे सुंदर कुटुंब वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवू.” असेही म्हणले आहे.

तत्पुर्वी ब्रिटनी स्पीयर्सने तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी देताना ‘माझी गर्भधारणा चाचणी झाली आहे आणि मी आई होणार आहे.’ असे सांगत चाहत्यांना माहिती दिली होती. वडिलांसोबत सुरू असलेला कायदेशीर वाद संपल्यानंतर ब्रिटनी स्पीयर्सने ही आनंदाची बातमी दिली आहे. ब्रिटनी स्पीयर्स म्हणाली की तिच्या वडिलांनी तिला अधिक मुले होण्याची इच्छा असूनही गर्भनिरोधक IUD काढण्यापासून रोखले होते. ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचा आधीचा पती केविन फेडरिन यांना आधीच दोन किशोरवयीन मुले सीन आणि जेडेन आहेत. त्याच वेळी, ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचा जोडीदार सॅम असगरी यांची पहिली भेट 2016 मध्ये त्यांच्या ‘स्लंबर पार्टी’ म्युझिक व्हिडिओ दरम्यान झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा