कृष्णा श्रॉफचे म्युझिक व्हिडिओमधून दमदार पदार्पण; तिच्या अदा पाहून स्वत: ला रोखू शकली नाही दिशा पटानी आणि…


बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ देखील त्याच्या प्रमाणेच फिटनेसची काळजी घेत असते. कृष्णा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मागील काही दिवसापूर्वी ती तिच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राइज घेऊन येणार आहे, अशी घोषणा केली होती. आता तिने तिचे हे वक्तव्य खरे केले आहे. तिने नुकतेच एका म्युझिक व्हिडिओमधून पदार्पण केले आहे. कृष्णाचा पहिला म्युझिक व्हिडिओ ‘किन्नी किन्नी वारी’ हा प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओमधील तिच्या अदा पाहून कोणीही या व्हिडिओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही.(Krishna Shroff first music video release)

कृष्णा श्रॉफच्या या पहिल्याच म्युझिक व्हिडिओला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तिच्या फोटो प्रमाणेच या व्हिडिओमध्ये ती खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. हा व्हिडिओ ‘बिजीबीएनजी’ म्युझिकद्वारे सादर केला आहे. या व्हिडिओमध्ये कृष्णासोबत जन्नत जुबैर, नगमा, राज शुकर आणि तन्वी देखील दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये कृष्णा बॉस लेडीच्या रुपात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्त्रीत्व साजरे केले जात आहे. कृष्णाने हा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे, ही बातमी सोशल मीडियावर दिली आहे.

कृष्णाचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अभिनेत्री दिशा पटानीने कमेंट केली आहे की, “ओ हो मार ही डाला किशू.” तसेच सोशल मीडिया युजरला देखील तिचे हे गाणे आणि तिचा ग्लॅमरस अवतार जबरदस्त आवडला आहे.

या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास राशी सूदने हे गाणे गायले आहे. दिलजोत मावीने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

कृष्णा ही सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते. ती नेहमीच तिचे जिममधील वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडतात. काही दिवसांपूर्वी कृष्णा तिच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ’ स्टार यशने खरेदी केले कोटींचे आलिशान घर; पत्नी राधिकासोबत पूजा करताना दिसला अभिनेता

जेव्हा वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक इंटीमेट सीन यायचा, तेव्हा…; तापसीने सांगितला ‘तो’ किस्सा

-महिमा चौधरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मंदिरा बेदीच्या पतीच्या मृत्यूवर ‘अशाप्रकारे’ दुःख व्यक्त केल्याने नेटकरी झाले नाराज


Leave A Reply

Your email address will not be published.