गुलाबाची कळी! अभिनेत्री क्रिती सेननचा गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जलवा; पाहून चाहत्यांना भुरळ


सोशल मीडियावर नेहमी अभिनेत्रींचे विविध लूकमधले बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो पोस्ट आणि व्हायरल होताना दिसत आहेत. आजच्या काळात सोशल मीडियाचे महत्त्व लक्षात घेऊन अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहतात. सोशल मीडियावरील पोस्टमुळे या अभिनेत्री प्रकाशझोतात येत असतात. या यादीत क्रिती सेनन देखील आहेच. फॅन्ससोबत जोडल्या गेल्याचे मुख्य माध्यम म्हणून क्रिती देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे.

अभिनेत्री क्रिती सेनन आजच्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून क्रितीने खूप कमी काळात ही ओळख मिळवली आहे. छोट्या करिअरमध्ये तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

क्रितीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “आय लव्ह पिंक.”

या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा वेस्टर्न शॉर्ट ड्रेस घातला असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. क्रितीने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या ड्रेससोबत डोळ्यांना गुलाबी आणि निळ्या रंगाचे आय शॅडो लावले असून त्यावर तिने केस मोकळे सोडले आहे. या फोटोंमधून तिने सर्वांनाच भुरळ घातली आहे. तिच्या या फोटोंना १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सध्या क्रिती तिच्या आगामी ‘मिमी’ या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. नुकताच तिच्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर तुफान गाजताना दिसत आहे. यात क्रिती एका सरोगसीने प्रेग्नेंट झालेल्या महिलेची भूमिका निभावताना दिसणार आहे. सरोगसी प्रेग्नन्सीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या चित्रपटासाठी क्रितीने १५ किलो वजन वाढवले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित क्रितीचा हा सिनेमा येत्या ३० जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबतच पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’


Leave A Reply

Your email address will not be published.