क्रिती सेननने केला आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर; दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना


‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन. क्रितीने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसची देखील सर्वत्र चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर ती अनेकवेळा जिममधील वर्कआऊट करताना फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच क्रितीचा बहुप्रतिक्षित आणि फॅमिली एन्टरटेनर चित्रपट ‘मिमी’ मधील तिचा फर्स्ट लूक रिलीझ झाला आहे. या पोस्टरमध्ये ती प्रेग्नंसी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या सोबतच टॅगलाईनमध्ये लिहिले आहे की, “तुम्हाला जी अपेक्षा आहे, तसे काहीच नाहीये.” या सोबतच तिने हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याबाबत देखील माहिती दिली आहे.

क्रितीने तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करून लिहिले आहे की, “या जुलैमध्ये. सामान्यपासून असामान्य होण्याचा विचार करा.” ‘मिमी’चा पोस्टर बघून प्रेक्षक आता हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु हा चित्रपट जुलै महिन्यात कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, याबाबत त्यांनी कोणतीच माहिती दिली नाही. (Kriti senon film mimi’s release date out with motion poster)

या चित्रपटात क्रितीसोबत सुप्रिया पाठक, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग मागच्या वर्षी पूर्ण झाली आहे. हा चित्रपट महिला केंद्रित असणार आहे. यामध्ये सरोगेट आईची कहाणी दाखवली जाणार आहे. दिनेश विजान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, दिनेश विजान यांना त्यांचा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा आहे. परंतु सगळी परिस्थिती पाहता त्यांनी हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे, याची अधिकृत घोषणा चित्रपटाचे निर्माते लवकरच करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.