केआरकेने केली मिका सिंगविरुद्ध तक्रार दाखल; गंभीर आरोप लावत म्हणाला, ‘माझ्या मुलीच्या फोटोंसोबत छेडछाड…’


सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेचा विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे अभिनेता कमाल आर खानचा. तो मागील काही दिवसांपासून चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याने आधी सुपरस्टार सलमान खानशी पंगा घेतला. यानंतर त्याने मिका सिंगवरही हल्ला बोल केला आहे. मिका आणि केआरके मागील काही दिवसांपासून एकमेकांवर निशाना साधत आहेत. आता केआरकेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे मिका सिंगची तक्रार केली आहे. (KRK Complains Against Singer Mika To Mumbai Police Said Is Threatening To Tamper With My Daughter Photo)

केआरके नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. त्याने मिकावर आरोप लावला आहे की, त्याने आपल्या फोटोंसोबत छेडछाड केली आहे.

केआरकेचा मिका सिंगवर गंभीर आरोप
नुकतेच केआरकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मुंबई पोलीस आणि आयुक्तांना टॅग करत एक ट्वीट केले आहे. केआरकेने ट्वीट करत लिहिले आहे की, “माननीय मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त कृपया लक्ष द्या की, मिका सिंगने माझ्या फोटोंसोबत माझ्या परवानगीशिवाय छेडछाड केली आहे. तसेच आपले गाणेही प्रदर्शित केले आहे. यासोबत तो माझ्या १४ वर्षीय मुलीच्या फोटोसोबतही छेडछाड करून गाणे प्रदर्शित करण्याची धमकी देत आहे. माझ्याकडे त्याचे सर्व मेसेज आणि रेकॉर्ड्स आहेत. कृपया माझी एफआयआर दाखल करून घ्या.”

केआरकेने अशाप्रकारे मिकावर गंभीर आरोप लावला आहे. त्याने मुलीच्या फोटोचाही मुद्दा उपस्थित केला आहे. आता त्याचे हे ट्वीट केआरके वेगाने व्हायरल होत आहे.

जाणून घ्या पूर्ण प्रकरण
सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा रिव्ह्यू करून अभिनेत्याशी पंगा घेतला होता. केआरकेने ‘राधे…’ चित्रपटाची थट्टा उडवली होती. त्यानंतर सलमानने त्याच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल केला होता. सलमान आणि केआरकेच्या या वादात मिका सिंगनेही उडी घेतली. त्यानेही केआरकेला चांगलेच सुनावले होते.

मिकाने स्वत:ला केआरकेचा बाप म्हटले होते आणि मारहाण करण्याची धमकीही दिली होती. यानंतर मिकाने घोषणा केली की, तो केआरकेवर एक गाणेही बनवणार आहे. ज्याचे बोल ‘केआरके कुत्ता’ असे आहेत.

यानंतर ११ जून रोजी मिकाने हे गाणे प्रदर्शित केले आहे. मिकाने ट्विटरवर गाण्याची माहिती देत लिहिले होते की, “मित्रांनो यावर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित गाणे ‘केआरके कुत्ता’ गाणे प्रदर्शित झाले आहे. माझा मुलगा कमार आर खान कृपया आता या गाण्यावर आपला रिव्ह्यू दे. या गाण्याला मी खूप मेहनतीने बनवले आहे.”

मिका सिंगचे हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ५ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. आणि ४०० पेक्षा अधिक रिट्विट मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त

-सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन; रामायणात साकारली होती ‘आर्य सुमंत’ची भुमिका

-‘लगान’ला २० वर्ष पूर्ण; ‘लाल सिंह चड्ढा’च्या या हटके लुकमध्ये आमिर खानने मानले चाहत्यांचे आभार


Leave A Reply

Your email address will not be published.