Friday, July 5, 2024

अभिनेत्री श्रद्धा आर्यासाठी सासूने पाठवली खास भेट, फोटो शेअर करत सुनेने केले सासूचे कौतुक

अभिनेत्री श्रद्धा आर्या ही तिच्या तुफान लोकप्रिय असणाऱ्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत प्रीता अरोरा ही मुख्य व्यक्तिरेखा निभावत आहे. तिला या शोमुळे अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. मालिकेत प्रीता आणि तिच्या सासूमध्ये एक खूपच छान असता आई मुली सारखा बॉंड दाखवला आहे, मात्र तुम्हाला माहित आहे का की खऱ्या आयुष्यात देखील श्रद्धा आणि तिच्या सासूचा बॉंड आई आणि मुलीसारखाच आहे. नुकताच श्रद्धाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हाला तिचे आणि तिच्या सासूचे नाते लक्षात येईल.

अभिनेत्री श्रद्धा आर्यासाठी तिच्या सासूने लाडू पाठवले, आणि सोबतच आपल्या लाडक्या सुनेसाठी एक न देखील लिहिली आहे. श्रद्धाने याचाच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये ठेवला. सोबतच सासूच्या हातच्या लाडूंचा फोटो देखील तिने पोस्ट केला होता. या नोटमध्ये तिच्या सासूने सुनेसाठी लिहिले होते, “राहुलने मला सांगितले होते की, तुला लाडू खूपच आवडतात. मी तुझ्यास्तही पाठवत आहे. ते लाडू तू खाऊन बघ. यात काही मेथीचे लाडू देखील आहे. जर तुला आवडले तर पुढच्या वर्षी पुन्हा बनवू.” यासोबत श्रद्धाने लिहिले, “जगातील बेस्ट सासू” सोबतच एक भावनिक ईमोजी देखील पोस्ट केला आहे.

तत्पूर्वी श्रद्धा आर्याने १६ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीच्या राहायला नागलसोबत लग्न केले. राहुल मर्चंट नेव्हीमध्ये असून, त्यांनी लग्न करण्यापर्यंत तात्यांच्या आत्याची कोणालाही भनक लागू दिली नाही. श्रद्धा नेहमीच तिच्या नवऱ्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसते. याचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या श्रद्धा ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत दिसत असून, मालिका टीआरपीमध्ये टॉपवर आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची भन्नाट केमिस्ट्री असणाऱ्या ‘शिव शास्त्री बलबोआ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
‘आई झाल्यानंतर सपनाचं करिअर संपलं’ म्हणणाऱ्यांची सपना चौधरीने घेतली शाळा; म्हणाली…

हे देखील वाचा