Thursday, April 18, 2024

आमिर आणि रीनाच्या घटस्फोटावर किरण रावचे मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘माझ्यामुळे काहीही झालेले नाही…’

किरण राव (kiran rao) सध्या तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने तिचा एक्स पती आमिर खानसोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘लापता लेडीज’च्या प्रमोशनदरम्यान आमिर आणि किरण अनेकदा एकत्र दिसतात. नुकतीच किरण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मीडियाशी मोकळेपणाने बोलताना दिसली.
आमिर खानने त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हिला 2002 मध्ये घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर काही लोकांनी सांगितले की, आमिरने किरण रावमुळे घटस्फोट घेतला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान किरण म्हणाली, “लोकांना वाटते की माझ्यामुळे आमिरने घटस्फोट घेतला, पण हे चुकीचे आहे. ‘लगान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर आणि मी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली नव्हती. लोकांना वाटते की मी ‘लगान’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक होते आणि याच काळात आम्ही जवळ आलो.”
किरण पुढे म्हणाली, “कदाचित कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही, पण ‘लगान’च्या शूटिंगदरम्यान आम्ही दोन-तीन वेळा बोललो नाही. 2004 मध्ये आम्ही पहिल्यांदा एकमेकांसोबत बाहेर जायला लागलो. त्या दिवसांत आमिर ‘मंगल पांडे’चे शूटिंग करत होता.”

किरण राव आणि आमिर खान यांनी २००५ साली लग्न केले होते.  त्यांना आझादचे नावाचा एक मुलगा देखील आहे. त्याचवेळी किरण आणि आमिर 2021 मध्ये परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे झाले. किरण म्हणते, ‘माझ्यासाठी माझी सर्वात मोठी प्राथमिकता माझा मुलगा आहे. त्याला कोणत्याही कारणाने वाईट वाटू  नये असे मला वाटते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘क्रू’चे धमाकेदार ‘घाघरा’ गाणे रिलीज, करीना-तब्बू-क्रितीच्या डान्स मूव्ह्सने लावली आग
अभिनेत्री प्रियांका चोप्रा करते मिस वर्ल्ड क्रिस्टीना प्रभावित; म्हणाली, ‘ती मला पुढे जाण्यासाठी…’

हे देखील वाचा