अभिनेता अमिर खानसह (aamir khan) त्याची एक्स पत्नी किरण राव (kiran rao) 13 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिने ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केल आहे. 1 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहत्यांचे अधिक लक्ष चित्रपटाऐवजी त्यातील कास्टींगकडे वेधले आहे. यामागचे कारणदेखील तसेच आहे. अमिर आणि किरणने या चित्रपटामध्ये एका नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. ती म्हणजे नितांशी गोयल.
काही दिवसांपूर्वी किरणने चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल एक मनोरंजक गोष्ट शेअर केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खाननंदेखील ऑडिशन दिले होते. मात्र, रवी किशनच्या ऑडिशननंतर किरणने आमिरला या भूमिकेसाठी नाकारले अन् रवी किशन यांना संधी दिली. रवी किशन हे पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच यासोबत तिनं नितांशी गोयल हिचं देखील नाव घेतलं होतं. त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला ही नवी अभिनेत्री कोण आह?
उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे राहणारी नितांशी गोयल ‘लापता लेडीज’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत डेब्यू करत आहे. अवघ्या १६ वर्षाची नितांशी गोयल ही स्नॅपचॅटची मास्टर असल्याचे बोलले जात आहे. नितांशीचे सोशल मीडियावर १ कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. आता ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाची स्टोरी ही दोन वधूंची आहे. यामध्ये एका वधुच्या भुमिकेत निशांती गोयल दिसणार आहे.
१२ जून २००७ ला जन्मलेली निशांती या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाबद्दल निशांती म्हणाली, मला या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. संधी मिळाली. करिअरच्या दृष्टीने मला मिळालेली ही खुप मोठी संधी आहे. मी आनंदी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितांशीने अभिनयाच्या करिअरची सुरुवात २०१६ मध्ये ‘मन में विश्वास है’ या मालिकेतून केली होती. यामध्ये निशांतीने शबरीची भूमिका बजावली होती. तसेच नितांशीने आत्तापर्यंत तक ‘नागार्जुन एक योद्धा’, ‘थपकी प्यार की’, ‘पेशवा बाजीराव’, ‘कर्मफल दाता शनि’ या चर्चेत असणाऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे.यासोबत वेब सीरीज इनसाइड एज 2′ मध्येही काम केले आहे. २०१५ मध्ये नितांशीने ‘मिस पँटालून जूनियर फॅशन आयकन 2015’ किताब जिंकला. तर २०१६ मध्ये इंडिया किड्स फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती.
या चित्रपटामध्ये रवी किशन, रंटा प्रतिभा, स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल, छाया कदम, दुर्गेश कुमार, सतेंद्र सोनी, प्रंजल पटेरिया आणि इतर काही कलाकार दिसणार आहे. लापता लेडीज या चित्रपटाची पटकथा ही बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘अचानक चेहऱ्याला मुंग्या आल्या आणि सगळं सुन्न झालं’ श्रेयश तळपदेने शेअर केला हृद्यविकाराच्या झटक्याचा अनुभव
‘भूल भुलैया 3’मध्ये विद्या बालन बनणार मंजुलिका, चित्रपटाची रिलीझ डेटही आली समोर