नोरा फतेही बनली चिमुरडीच्या डान्सची फॅन, ‘डान्स मेरी रानी’वरील मूव्ह्ज पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नोरा फतेही (Nora Fatehi) बॉलिवूडचा असा चेहरा बनली आहे, जिने आपल्या डान्सने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. जेव्हाही नोरा फतेही एका गाण्यात दिसली आहे, ते सुपरहिट झाले आहे आणि तिच्या डान्सला चाहत्यांनी दाद दिली आहे. नोरा फतेहीचे डान्स व्हिडिओ युट्यूबपासून सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात. सध्या नोरा आणि गुरु रंधावा यांच्या ‘डान्स मेरी रानी’ या लेटेस्ट गाण्याने धमाल केली आहे. हे गाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच ओठावर आहे. इतकेच नाही, तर या गाण्यावर आतापर्यंत अनेक इंस्टाग्राम रील्स बनवण्यात आल्या असून, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी नोरा फतेहीच्या गाण्यावर किलर डान्स मूव्ह्ज दाखवताना दिसत आहे. विशेष नोराही या मुलीची फॅन झाली आहे.

नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि एकत्रितपणे हार्ट आणि फायर इमोजी बनवले आहेत. गीत कौर बग्गा असे या चिमुरडीचे नाव आहे. नोराने या व्हिडिओमध्ये मुलीला टॅगही केले आहे. नोराने शेअर केलेला व्हिडिओ आतापर्यंत १० लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. (little girl’s dance video goes viral on Nora Fatehi’s song)

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेही एक अप्रतिम डान्सर आहे. गुरू रंधावा आणि नोरा यांनी ‘डान्स मेरी रानी’पूर्वी ‘नाच मेरी रानी’ हे गाणे एकत्र केले होते आणि तेही ब्लॉकबस्टर ठरले होते. या दोन गाण्यांच्या जबरदस्त यशानंतर गुरु रंधावा आणि नोरा फतेही यांची जोडी खूप हिट झाली असून त्यांना खूप मागणी आहे. २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या गाण्याला ८५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Latest Post