Saturday, April 20, 2024

वरुणने वाघासोबत, तर अनुष्काने कुटुंबासोबत म्हटले 2022ला बायबाय, पाहा कलाकारांच्या हटके पोस्ट

जगभरात सर्वत्र 2022 वर्ष संपून 2023 उजाडल्याचा आनंद साजरा केला जात आहे. बॉलिवूड कलाकारही नवीन वर्षाचा आनंद व्यक्त करत आहेत. हे वर्ष अनेक कलाकारांसाठी शानदार राहिले, तर काहींसाठी यादगार राहिले. अशात या कलाकारांनी 2022ला हटके अंदाजात गुडबाय म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर शानदार फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यापासून ते श्रिया सरन हिच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे.

बॉलिवूड कलाकारांनी केले 2022ला गुडबाय
अनुष्का आणि विराट कोहली
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Anushka Sharma And Virat Kohli) यांनी 2022मधील शेवटच्या उगवत्या सूर्याला निरोप दिला आहे. अनुष्का आणि तिचा पती तसेच क्रिकेटपटू विराटचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

कार्तिक आर्यनने 2022ला म्हटले थँक्यू
प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने 2022 वर्षाला सुंदर फोटो शेअर करत धन्यवाद म्हटले. यावेळी त्याने पोस्टमध्ये 3 फोटोंचा समावेश केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

आलिया भट्टसोबत बहिणीनेही दिला 2022ला निरोप
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची बहीण शाहीन (Shaheen) हिनेदेखील 2022ला आपल्या खास अंदाजात निरोप दिला. तिने आलियासोबत 2022या वर्षाला बायबाय केले.

अनन्या पांडेची पार्टी
सन 2022च्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pande) हिने नव्या नवेली नंदासोबत शानदार पार्टी केली. तसेच, 2022चा शेवटचा दिवसाचा आनंद लुटला. यादरम्यानचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

वरुण धवनने शेअर केला व्हिडिओ
अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) याने 2022 वर्षाच्या शेवटी सोशल मीडियावर आपला व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वरुण वर्षाच्या शेवटच्या दिवशी जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

शिल्पाने मुलासोबत साजरा केला वर्षातील शेवटचा दिवस
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने वर्षातील शेवटच्या दिवशी 2022ला निरोप दिला. तिने मुलासोबत वर्षातील शेवटच्या दिवसाचा आनंद लुटला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

श्रिया सरन
‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ सिनेमात अभिनेत्री श्रिया सरन (Shriya Saran) हिने दमदार भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले. अशात अभिनेत्रीने 2022ला खास फोटो स्टोरीवर शेअर करत शेवटचा निरोप दिला. (actress anushka sharma virat kohli to kartik aryan bollywood celebs goodbye 2022 with these photos)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आता बॉक्स ऑफिस हादरणार! 2023मध्ये पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार ‘या’ जोड्या, यादी पाहाच
Bye Bye 2022| कायम आठवणीत राहतील असे शेफाली शाहचे 5 संस्मरणीय भूमिका, पाहाच यादी

हे देखील वाचा