Friday, March 29, 2024

एवढे दिवस जे कमावलं, ते झटक्यात गमावलं! सपना चौधरी विरोधात लखनऊ कोर्टाचे अटक वॉरंट

बुधवारी (१७ नोव्हेंबर) रोजी लखनऊ कोर्टने डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट पाठवला आहे. सपना चौधरीचा शो रद्द झाल्यावर तिने प्रेक्षकांचे पैसे परत न केल्याचा आरोप तिच्यावर लावला आहे. या बाबत एडिशनल चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागीने यांनी तिच्या विरोधात अटक वॉरंट पाठवून पोलिसांना आदेश दिला आहे की, कोर्टाच्या पुढच्या सुनावणीपर्यंत तिला कोर्टात हजर रहावे लागेल.

कोर्टाला सपनाच्या विरोधातील सर्व आरोपांची सुनावणी घ्यायची आहे, त्यामुळे तिला कोर्टात हजर राहावे लागणार आहे. या बाबत एफआयआर दाखल झाल्यानंतर सपना चौधरीने‌ ही तक्रार चुकिची असल्याचे सांगून विनंती केली होती. परंतु नंतर ती देखील रद्द करण्यात आली आहे. (Lucknow Court issues arrest warrant against dancer sapna Chaudhary)

आशियाना पोलीस स्टेशनमध्ये सपना चौधरी विरोधात दिलेली ही तक्रार १४ ऑक्टोबर २०१८ रोजीची आहे. लखनऊमधील स्मृती उपवनमध्ये दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत एक शो होता, जो रद्द झाला होता. या प्रकरणात तिच्या व्यतिरिक्त या शोचे आयोजक  जुनेद अहमद, नवीन शर्मा, इवाद अली, अमित पांडे आणि रत्नाकर अपद्याय यांच्याही नावाचा समावेश आहे.

कोर्टाने सांगितले आहे की, या शोसाठी प्रेक्षकांनी ३०० रुपयाचे तिकीट खरेदी केले होते. हा शो बघण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते, परंतु १० वाजून गेले तरीही सपना शोसाठी आली नव्हती. ज्यामुळे प्रेक्षकांनी हंगामा केला होता. त्याचविरोधात आता तिला कोर्टात उपस्थित राहावे लागणार आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीमधील सपना एक लोकप्रिय डान्सर आहे. अनेक ठिकाणी तिचे मोठमोठे शो होत असतात. तिच्या डान्सचे अनेक दीवाने आहेत. त्यामुळे तिच्या शोला देखील खूप प्रेक्षक उपस्थित असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Jai Bhim: चित्रपटावरून झालेल्या वादामुळे सूर्याला मिळतायत धमक्या, घराबाहेर पोलीस तैनात

-सरकारचा मोठा निर्णय! पुनीत राजकुमारला मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

-पूजा हेगडे मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो शेअर करत म्हणाली, ‘एक सामान्य मुलगी…’

हे देखील वाचा