Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड ‘मी आता थकलोय’, प्रसिद्ध गायक लकी अली होणार निवृत्त, संगीतविश्वाला करणार बाय-बाय?

‘मी आता थकलोय’, प्रसिद्ध गायक लकी अली होणार निवृत्त, संगीतविश्वाला करणार बाय-बाय?

प्रसिद्ध कॉमेडियन मेहमूद यांचा मुलगा आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक-अभिनेता लकी अली यांना (Lucky Ali) ओळखत नसेल अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. 90 च्या दशकातील लोकांना लकी अलीचे नाव ओळखायला जास्त वेळ लागणार नाही. लकीची अनेक सुपरहिट गाणी आपण सर्वांनी ऐकली आहेत. आपल्या जादूई आवाजाने लकी अली यांनी प्रत्येकालाच वेड लावले होते मात्र लकी अलीच्या आवाजाची जादू गेल्या काही काळापासून स्टेज परफॉर्मन्सपर्यंतच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत लाइमलाइटपासून दूर असलेला लकी पुन्हा एकदा एका संवादामुळे चर्चेत आले आहेत.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, बॉलीवूड गायक आणि संगीतकार लकी अली यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पुढील कारकिर्दीबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. आता त्याला संगीतातून संन्यास घ्यायचा आहे, असे त्यांनी  संवादादरम्यान सांगितले. ते म्हणतात की, “मला आता संगीतापासून दूर जायचे आहे आणि मी माझ्या आयुष्यात न केलेल्या गोष्टी करायच्या आहेत. मी संगीत पूर्णपणे सोडत नाही पण किती मी योगदान देऊ शकेन हे देखील माहित नाही.” याबद्दल पुढे बोलताना लकी अली यांनी सांगितले की, ते ‘इंतेजार’ बनण्यापूर्वी लवकरच निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. या बद्दल बोलताना ते म्हणतात की , “मी खूप दिवसांपासून निवृत्त होण्याचा विचार करत होतो. माझ्यावर असलेल्या इतर जबाबदारीप्रमाणे मी ही जबाबदारी घेतो. जेव्हा माझ्या मुलांनी त्यांची संगीत कंपनी सुरू केली. तेव्हाच मी आपली जाण्याची वेळ आली आहे असा निर्णय घेतला होता.”

एकीकडे कोविडमुळे संपूर्ण जग त्रस्त असताना, यावेळी लोकांना त्यांच्या कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवण्याची संधीही मिळाली. याचा आनंद सिंगर लकीच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता. लकी म्हणाला, “मला खूप आनंद झाला की कोणतेही कार्यक्रम होत नाहीत. मी हा वेळ माझी सुट्टी म्हणून घेत होतो आणि मला खूप आनंद झाला की मला कुठेही प्रवास करावा लागला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मला खूप कठीण गेले होते. असेही तो यावेळी म्हणाला.

दरम्यान लकी अली बऱ्याच काळापासून लाइव्ह शो आणि कॉन्सर्ट करत आहेत. अशा परिस्थितीत लाइव्ह शोबद्दल बोलताना ते म्हणाले, “लाइव्ह शोचा आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर खूप खोलवर परिणाम होतो. आपल्याला पूर्णपणे नवीन ठिकाणी जायचे आहे. ते ठिकाण कितीही चांगले असले तरी घराचे सुख  नाही. आता थकवा जाणवत आहे म्हणून मला वाटते की माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.” लकी अली यांनी आपल्या जादूई आवाजात अनेक गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा