×

लग्नाच्या प्रश्नावर नुसरत जहाँ म्हणाल्या, “तुम्हाला कसे माहित मी लग्न केले नाही?”

टीएमसी खासदार आणि अभिनेत्री असलेल्या नुसरत जहाँ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठीच चर्चेत आणि प्रकाशझोतात येतात. त्यांचे आयुष्य अनेकदा मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय ठरत असते. पण त्यांनी कधीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मीडियासमोर मोकळेपणाने भाष्य केले नव्हते. मात्र नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या जीवनातील अनेक अशा पैलूवर संवाद साधला ज्याबद्दल लोकांना जास्त माहिती नव्हती.

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नुकताच अभिनेत्री नुसरत जहाँ यांचा ‘स्वास्तिक संकेत’ नावाचा सिनेमा आला. त्या चित्रपटाच्या प्रमोशनवेली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी अतिशय मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा यिशान आणि जोडीदार यश दासगुप्ताबद्दल देखील काही गोष्टी सांगितल्या. नुसरत म्हणाल्या, यिशान आल्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले आहे. निखिल जैनसोबत त्यांचे नाते संपल्यानंतर यश दासगुप्ता त्यांचा जोडीदार बनला. याबद्दल त्या म्हणाल्या की, त्यांना त्यांच्या या निर्णयाबद्दल खूपच गर्व असून, त्या स्वतःला आजच्या काळातील हिंमतवान महिला मानतात.

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नुसरत यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, “आता माझा वेळ माझे काम आणि घर यांमध्ये विभागला गेला आहे. आधी लोकं मला म्हणायचे की मी खूपच वेळेवर येते मात्र आता यिशान आल्यानंतर माल नेहमीच उशीर होतो. मी घरातून निघताना तो खूप आशेने माझ्याकडे बघतो, त्यामुळे मला त्याला वेळ देऊन यावे लागते.”

बाळ झाल्यानंतर त्यांनी बाळाच्या वडिलांच्या नावाचा खुलासा न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर त्यांनी स्वतः हा खुलासा केला. याबद्दल पुढे नुसरत म्हणाल्या की, “आई झाल्यानंतर सर्वांच्याच आयुष्यात खूप बदल होतात. भारतातील काही कायद्यांनुसार मी काही प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

आता नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता त्यांच्या नात्यावर खुलेपणाने बोलताना दिसतात. यश दासगुप्ता आणि त्या एक परिवार असल्याचे त्या मानतात. त्यांना लग्नाविषयी विचारल्यावर त्यांनी हा विषय तालात म्हटले की, “तुम्हाला कसे माहित माझे लग्न झाले नाहीये?” मधल्या काही काळात त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले याबद्दल त्या म्हणाल्या, “मी आधीपासूनच एक मजबूत मुलगी आहे. मी नेहमीच माझे निर्णय घेतले आहे. ते योग्य असो किंवा अयोग्य असो, चांगले असो किंवा वाईट त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टींसाठी स्वतः जबाबदार आहे. नुसरत जहाँ नुकत्याच ‘स्वस्तिक संकेत’मध्ये शाश्वत चट्टोपाध्यायसोबत दिसल्या.

हेही वाचा :

Latest Post