‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने पहिल्यांदाच केला आईसोबतचा फोटो शेअर, चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस

madhuri dixit first time shares her mother picture social media


बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित एक अशी अभिनेत्री आहे, जिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आजही उत्सुक असतात. माधुरी ही केवळ एक अभिनेत्रीच नाही तर हिंदी सिनेमातील प्रसिद्ध डान्सरही आहे. तिच्या हिंदी चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले, जे आजही प्रेक्षक मोठ्या उत्साहाने पाहतात. माधुरीच्या अदांचा प्रत्येक चाहता वेडा आहे. 80 व 90च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचा चाहतावर्ग मोठा असल्याने, फोटो पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात.

आता चर्चा आहे तिने पोस्ट केलेल्या आईच्या फोटोची. माधुरी दीक्षितने नुकताच तिच्या आईसोबतचा एक फोटो पहिल्यांदाच शेअर केला आहे. या फोटोमध्ये आई व पती नेनेसोबत माधुरीही दिसत आहे. ‘अनमोल’ या कॅप्शनसह माधुरीचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. केवळ एका दिवसात या फोटोला तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर गेल्या वर्षी ती ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ या दोन बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली. आता ती ‘डान्स दिवाने’च्या नव्या सिझनमध्ये जज आहे.

माधुरी दीक्षितने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरूवात 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे केली होती. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केली नाही. तिला ‘तेजाब’ या चित्रपटापासून हिंदी चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली. पुढे तिने ‘त्रिदेव’, ‘राम-लखन’, ‘प्रेम ग्रंथ’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘ये रास्ते हैं प्यार के’ यांसारख्या चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-जब्याच्या शालूनं वेधलं चाहत्यांचं लक्ष! एकाच व्हिडिओत झळकली दोन वेगळ्या रुपात

-मुंबईचा ‘डॅडी’ बनणार आजोबा! मुलीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल

-जस्टीन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं नवीन गाणं रिलीझ, ३ दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.