जब्याच्या शालूनं वेधलं चाहत्यांचं लक्ष! एकाच व्हिडिओत झळकली दोन वेगळ्या रुपात


‘फँड्री’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सगळ्यात जास्त चर्चा झाली ती ‘जब्या’ आणि ‘शालू’ म्हणजेच सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात यांची. मळकट कपड्यात राहणारा, गरीब घरातला जब्या आणि साधं व स्वच्छ राहणीमान असणारी, पाटलांची मुलगी शालू या दोघांनी अवघ्या प्रेक्षक वर्गाला भारावून सोडलं होतं. त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच चकित केले होते.

जब्या बराच काळापासून लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र, शालू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. खरं तर जब्याची निरागस शालू खूप बदलली आहे. राजेश्वरी आता बोल्ड झालीये. तिने पोस्ट केलेले फोटो खूप व्हायरल होतात, यावरून चाहत्यांना तिचे हे बदललेले रूप आवडल्याचे दिसून येते.

नुकताच, तिने पोस्ट केलेला एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिचे दोन लूक पाहायला मिळाले. पहिल्या लूकमध्ये फँड्रीमधली शालू पाहायला मिळली, तर दुसरा लूक हा स्टायलिश होता. दुसऱ्या लूकमध्ये राजेश्वरीने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि करड्या रंगाची पँट घातली आहे.

तिने व्हिडिओला “2014 ते 2020 आणि पुढे अजून मोजत आहे” असे कॅप्शन दिले आहे. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. कमेंट करून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओतील तिचा हटके अंदाज चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसून येत आहे.

राजेश्वरी खरात ही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली आहे. राजेश्वरीचे वडील बँकेत काम करतात. तिचे शालेय शिक्षण पुण्यातील जोग एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत पूर्ण झाले आहे. तसेच, तिने सिंहगड महाविद्यालयात बी.कॉमची पदवी मिळवली.

याव्यतिरिक्त राजेश्वरीने ‘फँड्री’ या चित्रपटानंतर ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु आधीच्या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटाला यश मिळाले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-मुंबईचा ‘डॅडी’ बनणार आजोबा! मुलीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल

-जस्टीन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं नवीन गाणं रिलीझ, ३ दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.