×

भररस्त्यावर अज्ञात व्यक्तीची माही विजच्या गाडीला धडक, गैरवर्तन करत दिली बला*त्काराची धमकी

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने नुकतीच ट्विटरवर एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने तक्रार केली की, तिच्या कारला एका अनोळखी व्यक्तीने धडक दिली आणि नंतर तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीने अभिनेत्रीला बला*त्काराची धमकीही दिली. याप्रकरणी अभिनेत्रीने मुंबई पोलिसांचीही मदत मागितली.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ क्लिप शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एका व्यक्तीने माझ्या कारला धडक दिली आणि नंतर मला शिवीगाळ केली. त्या व्यक्तीने मला बला*त्काराची धमकीही दिली. यादरम्यान तो त्याच्या पत्नीसोबत उपस्थित होता. त्याची पत्नी देखील आक्रमक बनली.” आपल्या ट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत माही विजने मदतीसाठी लिहिले, “मुंबई पोलीस, या व्यक्तीला शोधण्यात मला मदत करा.” (mahhi vij unknown person misbehaved with mahhi vij after hitting her car gave rape threats)

शेअर केलेल्या या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचा कार नंबर रेकॉर्ड केला आहे. त्याचवेळी, माही विजच्या ट्वीटला उत्तर देत मुंबई पोलिसांनी सांगितले की, “कृपया जवळच्या पोलीस ठाण्यात जा आणि तुमची तक्रार नोंदवा.” यानंतर माहीने मुंबई पोलिसांच्या या ट्वीटचा हवाला देत सांगितले की, ती वरळी स्टेशनवर गेली होती, जिथे तिला मदतीचे आश्वासन देण्यात आले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री ‘लागी तुझसे लगन’ आणि ‘बालिका वधू’सारख्या लोकप्रिय शोमध्ये दिसली आहे. सध्या ही अभिनेत्री लवकरच ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या डान्सिंग रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. माहीने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता जय भानुशालीसोबत (Jay Bhanushali) लग्न केले आहे. दोघेही डान्स रियॅलिटी शो ‘नच बलिए’मध्ये कपल म्हणून दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post