Sunday, May 19, 2024

‘या’ ठिकाणी करणार मलायका आणि अर्जुन लग्न, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान घटस्फोटानंतर ते त्यांचे स्वतंत्र आयुष्य जगात आहेत.. अरबाजने अलीकडेच सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले, तर मलायका देखील अर्जुन कपूरला ६-७ वर्षांपासून डेट करत आहे. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या अफवा सतत येत असल्या तरी, हे जोडपे नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीने या अफवांचे खंडन करतात. अलीकडे मलायका अरोराला तिच्या लग्नाचे काय प्लान आहेत असे विचारण्यात आले. यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

मलायका अरोरा तिचा मुलगा अरहान खानच्या पॉडकास्ट डंब बिर्याणीच्या एका भागात पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. रॅपिड-फायर राउंड दरम्यान, अरहानने त्याच्या आईला तिच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल प्रश्न विचारला. अरहानने मलायकाला विचारले होते की ती कोणत्या तारखेसह, ठिकाण आणि व्यक्तीसोबत लग्न करणार आहे? यावर मलायका म्हणाली की ती सध्या या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही आणि तिने मिरची खाणे पसंत केले. ती पुढे म्हणाली की ती सध्या तिचे सर्वोत्तम आयुष्य जगत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या केमिस्ट्रीची झलक शेअर करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत, परंतु जेव्हा त्यांना त्यांच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल विचारले जाते तेव्हा मलायका आणि अर्जुन दोघेही लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत असे सांगतात

19 वर्षे संसार केल्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. या जोडप्याने 2002 मध्ये त्यांचा मुलगा अरहान खानचे स्वागत केले. घटस्फोटानंतरही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अलीकडेच मलायका अरबाज आणि त्याची दुसरी पत्नी शूरासोबत डिनर डेटवरही दिसली होती.

अर्जुन कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता रोहित शेट्टीच्या कॉप्स युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि इतर अनेक स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मलायका अरोराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती अलीकडेच अर्शद वारसी आणि फराह खान यांच्यासोबत डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा सीझन 11 मध्ये जज म्हणून दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रेग्नन्सीमध्येही दीपिका पदुकोण करत आहे ‘सिंघम अगेन’चे शूटिंग, सेटवरील फोटो व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन घेतली भेट, न्याय मिळवून देण्याचे दिले आश्वासन

हे देखील वाचा