×

Oopss! जेव्हा स्टायलिश आऊटफिटने मलायका अरोराला दिला धोका, भर स्टेजवर झाली पंचायत

मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या हॉट लुक्ससाठी ओळखली जाते. मात्र घटस्फोटानंतर ती आणखीनच बोल्ड झाली आहे. तिचे छोटे कपडे अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येतात आणि ही हॉटनेस कधीकधी तिच्यासाठी अडचणीचा विषय ठरतो. होय, एकदा मलायकाचे ब्रालेट बाजूने इतके खाली सरकले, की मलायकाला सर्वांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले होते.

स्टोर लॉन्चसाठी पोहचली होती मलायका
अभिनेत्री मलायका अरोरा हे बॉलिवूड जगतात मोठं नाव आहे. मलायका दरदिवशी माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असते. ती तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेते. आपल्या ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांची मने जिंकणारी ही अभिनेत्री जास्त फॅशनेबल कपडे परिधान केल्यामुळे अनेकवेळा Oops Momentची शिकार झाली आहे. मलायका अरोरा अधिक बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. एकदा मलायका अरोरा स्टोअर लॉन्चसाठी पोहोचली होती. जिथे ती भर गर्दीत उप्स मूमेंटची शिकार झालेली पाहायला मिळाली. (malaika arora oops moment caught in store launch event)

मलायकाचा Oops Moment!
मलायका अरोरा एका स्टोअर लॉन्चसाठी पोहोचली होती, जिथे अनेक बॉलिवूड स्टार्सही सामील झाले होते. या स्टोअर लॉन्च दरम्यान मलायका अरोरासोबत करण जोहर (Karan Johar), गौरी खान (Gauri Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) सारखे अनेक स्टार्स पोहोचले होते. यावेळी मलायका अरोरा कॅमेऱ्यासमोर पोझ देत होती. तिने डीप नेक क्रॉप टॉप आणि बेल बॉटम पेंटसह ब्लेझर घातला होता. कॅमेरासाठी पोझ देताना मलायका अरोराचा क्रॉप टॉप खूप खाली घसरला आणि ती उप्स मूमेंटची बळी ठरली.

व्हिडिओ व्हायरल
मलायका अरोरा मीडियासमोर जबरदस्त पोझ देत होती. पण आपला टॉप थोडा खाली सरकल्याचे तिला कळलेही नसावे. नंतर मलायका अरोराने जेव्हा तिच्या कपड्यांकडे लक्ष दिले, तेव्हा तिला समजले की ती मीडियासमोर उप्स मूमेंटची शिकार झाली आहे. यानंतर ती लपून तिचा टॉप फिक्स करताना दिसली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण अभिनेत्रीचा उप्स मूमेंट कॅमेऱ्यात कैद झाला होता.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post