[rank_math_breadcrumb]

मलायका अरोराची डेटिंग अफवांवर स्पष्ट प्रतिक्रिया, सोहराब बेदीसोबतच्या चर्चांवर केले भाष्य

मलायका अरोरा ही एक बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आणि ती तिच्या बोल्ड फॅशन निवडींमुळे अनेकदा चर्चेत असते. तर ती वयाच्या 52 व्या वर्षीही ती अतिशय फिट दिसते. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, तिच्या अनेक चित्रपट हे गाजले आणि प्रेक्षकांच्या मनात तिने स्थान ही निर्माण केले, मात्र व्यावसायिक कामाव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. अलीकडेच, मलायका अरोरा आणि सोराब बेदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे ती चर्चेत आली. ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवांना सुरुवात झाली.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (arora)आणि अभिनेता सोराबने याच्या या अफवांवर आता सोराबने उघडपणे भाष्य केले. तर मलायकाने एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारला ते म्हणजे ती पुन्हा प्रेमाच्या शोधात आहे की नाही, यावर तिने भाष्य केले. या संभाषणादरम्यान, मलायकाने असेही म्हटले की प्रेम आणि सहवासासारख्या गोष्टींचे नियोजन करता येत नाही. ते सहज होत असत. तर सोहराब बेदीनंतर आता मलायका अरोराने सुरू असलेल्या डेटिंगच्या अफवांवर उघडपणे भाष्य केले आहे. ती म्हणाली, “या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागला आहे. मी याकडे एक गंमत म्हणून पाहते. मी आणि अरहान यावर एकत्र हसतो. मी या गोष्टींचे नियोजन करू शकत नाही. जे व्हायचं असेल, ते होईलच.  अर्थातच, कोणीतरी असणं, एक जोडीदार असणं हे सर्व खूप छान आहे.

मलायका अरोराने 1998 मध्ये बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाज खानशी लग्न केले.  2002 मध्ये त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अरहान आहे. 2017 मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर लगेचच, ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि काही वर्षे डेटिंग केल्यानंतर हे जोडपे वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

1200 कोटी बजेटच्या सिनेमात रणबीर कपूरचा अनोखा लुक, सहा दिवसात अजून एक सरप्राईज होणार उघड