मलायका अरोराने सोनेरी साडीत केला कहर, अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहुन चाहते झाले घायाळ

बॉलिवूड सर्वात हाॅट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि रोज चाहत्यांसाठी काहीतरी शेअर करत राहते. ती फिटनेस विषयी स्वतः ची प्रचंड काळजी घेते. अनेक वेळा पॅपराजीच्या कॅमेऱ्यात कैद होते, ज्यामुळे ती सतत चर्चेत येत असते. बॉलिवूडची मुन्नी आणि अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत राहते. तिची एक झलक पाहून तिचे चाहते वेडे होतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मलायका अरोराने अलीकडेच तिच्या शानदार स्टाईलने साडी नेसून चाहत्यांना घायाळ केले आहे.

मलायका अरोरा लाखो लोकाच्या हृदयावर राज्य करते, पुन्हा एकदा मलायका अरोराने साडीमध्येही बोल्डनेसच्या सीमा ओलांडल्या आहेत. मलायकाने अलीकडेच साडी नेसून तिच्या जबरदस्त स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे‌. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, की तिने सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. यातील तिचा अंदाज अतिशय बोल्ड आणि हॉट आहे. ही साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे, ज्यात तिने अप्रतिम फोटोशूट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका अरोरा एक यशस्वी भारतीय मॉडेल, माजी एमटीव्ही व्हीजे तसेच बॉलिवूडची आयटम गर्ल आहे. तिने ‘छैय्या छैय्या’ आणि सुपर हिट आयटम साँग ‘मुन्नी बदनाम’मध्ये काम केल आहे. मलायका अरोरा आजकाल अर्जुन कपूरला डेट करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, अलीकडे मलायका अरोराच्या कमाईची तुलना अर्जुन कपूरच्या कमाईशी केली गेली. ज्यामध्ये असे म्हटले होते की, मलायका कमाईच्या बाबतीत तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरपेक्षा जास्त कमावते. तिची एकूण वार्षिक कमाई १०० कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी, अर्जुन कपूरची कमाई ८८ कोटी असल्याचे सांगितले गेले.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

चित्रपटांमध्ये, आयटम सॉंग करण्यासाठी मलायका सुमारे १.७८ कोटी रुपये घेते. त्याच वेळी, रियॅलिटी शोमध्ये कोणतीही भूमिका साकारण्यासाठी, ती शोच्या निर्मात्यांकडून देखील भरमसाठ फी घेते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

Latest Post