सध्या सिनेसृष्टीतून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर तिला एका आजाराची लागण झाल्याची माहिती अभिनेत्रीने स्वतः तिच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ( Malayalam Actor And TV Show Host Mithun Ramesh Hospitalised Following An Attack Of Bells Palsy )
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला युवा मल्याळम अभिनेता मिथुन रमेश याला याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुनला ‘बेल्स पाल्सी’ हा दुर्मिळ आजार झाला असून सध्या त्याच्यावर केरळमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘बेल्स पाल्सी’ हा अर्धांगवायूचा एक प्रकार आहे. यामध्ये चेहऱ्याच्या काही भागात पॅरालिसिस होतो. इतक्या गंभीर आजाराशी अभिनेता रुग्णालयात झुंज देत असून त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
अभिनेता मिथुनने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या या आजाराबद्दल सांगितले आहे. “मला ‘बेल्स पाल्सी’ हा दुर्मिळ आजार झाला आहे. त्यामुळे मी माझे दोन्ही डोळे एकत्र बंद करू शकत नाही. त्रिवेंद्रम येथील अनंतपुरी रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत”, असे अभिनेत्याने सांगितले. महत्वाचे म्हणजे 2021 साली देखील मिथूनला अर्धांगवायूचा झटका आला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक बेनी दयालचा अपघात ड्रोन पडल्यामुळे गंभीर जखमी
– चला हवा येऊ द्या मधून ‘या’ प्रसिद्ध विनोदवीराने घेतली एक्सिट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण