सीडीएस बिपीन रावत यांचा अपमान; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याकडून धर्मांतराची घोषणा, मुस्लीम सोडून हिंदू धर्म स्विकारणार


सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जवानांच्या हौतात्म्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. एकीकडे देशभरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचा आदर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू, दुसरीकडे काहीजण देशाच्या या दिवंगत नायकाला लक्ष्य करत आहेत.

केरळमधील मल्याळम चित्रपटांचा दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यामुळे खुप निराश झालेत. इतकंच नाही तर स्वधर्मातील कट्टरपंथीयांच्या अशा वागणूकीला त्रासल्याने त्यांनी थेट धर्मांतराची घोषणा केली आहे. ते आता त्यांचा मुळ मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारणार आहेत.

हेही वाचा – देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन! कलाविश्वातून अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

Ali-Akhbar
Ali Akhbar

निर्मात्याने कुटुंबासह मुस्लिम धर्माचा त्याग करत लवकरच पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचे सांगितले. फेसबुक लाईव्हवर त्यांनी येऊन, इस्लामचा त्याग करत असल्याचे म्हटले. अली अकबर म्हणाले की, “लष्करप्रमुख सीडीएस बिपिन रावत यांच्या हौतात्म्यानंतर अनेक लोक फेसबुकवर जल्लोष करत होते, ज्याच्या निषेधार्थ ते इस्लाम सोडत आहेत.”

माध्यमांतील वृत्तानुसार, ८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर, अकबर यांनी फेसबुकवर एक लाइव्ह व्हिडिओ शूट केला. परंतु फेसबुकने चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे खाते एका महिन्यासाठी निलंबित केले आणि त्यांना वर्णद्वेषी म्हटले. यानंतर चित्रपट दिग्दर्शकाने दुसरे फेसबुक अकाऊंट बनवले आणि त्याद्वारे लाइव्ह येऊन इस्लाम सोडण्याची घोषणा केली.

सीडीएस रावत यांना फेसबुकद्वारे श्रद्धांजली वाहणारे चित्रपट दिग्दर्शक म्हणाले, “हे स्वीकारले जाऊ शकत नाही. म्हणूनच मी माझा धर्म सोडत आहे, माझा किंवा माझ्या कुटुंबाचा दुसरा कोणताही धर्म नाही.” लाईव्हद्वारे ते म्हणाले, “मी त्या कपड्यांचा एक तुकडा फेकतो ज्यासह मी जन्माला आलो.” खरं तर, जेव्हा चित्रपट दिग्दर्शकाने सीडीएस रावत यांच्या मृत्यूवर थेट व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तेव्हा कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी त्यांच्या व्हिडिओवर हजारो हसणारे इमोजी टाकून त्यांची खिल्ली उडवली, ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या.

Ali-Akbar-Fcaebook-Live
Ali-Akbar-Fcaebook-Live

या प्रकरणी ट्विटर युजर प्रतिश विश्वनाथ यांनी सांगितले की, “प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर हिंदू धर्म स्वीकारत असून, त्यांचे नाव बदलून रामसिंगन ठेवत आहे. इस्लामची सध्याची पिढी, ज्यांच्या पूर्वजांचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले होते, त्यांना त्यांच्या मुळांकडे परत येताना पाहून खूप आनंद झाला,” असे ट्वीट करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा – 


Latest Post

error: Content is protected !!