Saturday, January 4, 2025
Home साऊथ सिनेमा बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध गायक एमएस नसीम यांचे निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध गायक एमएस नसीम यांचे निधन

नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर कोरोना निवळायला लागला, आणि आता सर्व काही सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच २०२० सारख्याच काही घटना पुन्हा या वर्षात देखील घडत आहे. २०२१ च्या पहिल्या दोन महिन्यातच अनेक कलाकारांनी आपल्याला अलविदा म्हणत या जगाचा निरोप घेतला. राजीव कपूर यांच्या निधनाची बातमी ताजी असतानाच, आता दुसऱ्या एका कलाकाराच्या मृत्यूची बातमी आली आहे.

मल्याळम गायक एमएस नसीम यांचे बुधवारी (१० फेब्रुवारी) तिरुवनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मागच्या १० वर्षांपासून ते पॅरलाईज्ड होते. यामुळेच त्यांच्या गायनाच्या करियरवर देखील खूप मोठा परिणाम झाला होता.

त्यांच्या निधनावर केरळ राज्याचे सांस्कृतिक मंत्री एके बालन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी नसीम यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, “एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक, आयोजक आणि तिरुवनंतपुरमच्या पर्यायाने केरळच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे अभिन्न व्यक्तिमत्व म्हणून नसीम खूप महत्वाचे होते.”

एमएस नसीम हे खूप चांगले गायक होते. त्यांनी अनेक नाटकं आणि स्टेज शोमध्ये ते नेहमी प्रेक्षकांना त्यांच्या अप्रतिम गाण्याने मंत्रमुग्ध करत. १९८७ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. यासोबतच त्यांना अनेक विविध पुरस्कार देखील मिळाले.

एमएस नसीम यांचा जन्म केरळच्या पचल्लूर या ठिकाणी झाला. त्यांनी त्यांच्या शालेय जीवनापासूनच गाणे गायला सुरुवात केली होती. वयाच्या केवळ ११ व्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात पाय ठेवला आणि कामकुराचे गाणे गायले. पुढे कॉलेजमध्ये असताना ते नेहमी सर्व गायनाच्या कार्यक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचे. पुढे त्यांनी अनंतवरुत्तन्तम या सिनेमासाठी गाणे गायले होते. नसीम यांनी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर देखील हजारो गाणे गायले. गायनासोबतच ते उत्तम असे संगीत समीक्षक देखील होते. ते पडद्यामागे कॉर्डिनेटर आणि प्रोग्राम कंडक्टर म्हणून देखील काम करायचे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज
-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा