कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


भोजपुरी गायिका कल्पनाचे नुकतेच ‘फूलौरी बिना चटनी हे गाणे रिलीझ झाले आहे. हे गाणे टी सीरिजच्या ‘हमार भोजपुरी’ या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध झाले आहे. तथापि, गाण्याची फक्त ऑडिओ आवृत्ती प्रकाशित केली गेली आहे. पण केवळ ऑडिओमध्ये प्रदर्शित झाल्यानंतरही या गाण्याला एकाच दिवसात सुमारे 6 हजार पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कल्पनाच्या आवाजात गायलेल्या या गाण्याचे बोल विनय बिहारी यांनी लिहिले आहेत. तसेच, धनंजय मिश्रा हे गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत.

‘फूलौरी बिना चटनी’ गाण्यावर या अगोदरही गाणी तयार केली गेली आहेत. यापूर्वी देखील कल्पनाने हे गाणे गायले आहे. 7 आणि 11 वर्षांपूर्वी हे गाणेही रिलीझ झाले होते. विशेष म्हणजे नुकतेच रिलीझ झालेल्या कल्पनाच्या या गाण्याचे बोलही जुन्या गाण्यांप्रमाणेच आहेत.

तसेच, सलमान खानच्या फिल्म दबंगमध्ये हेच गाणे ममता शर्मा यांनीही गायले आहे.

अनेक चाहत्यांना माहित नाही की, कल्पना पटवारी ही पहिली भोजपुरी गायिका आहे, ज्यांनी खडी बिरहची जुनी परंपरा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणली. तिने 2013 साली मुंबईतील बिदेसिया येथे डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये काम केले आहे. इतकेच नव्हे तर कल्पनाला सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने भारतीय आगमन दिनासाठी 15 दिवसांच्या लॅटिन अमिरेकी देशांच्या दौर्‍यावरही आमंत्रित केले होते.

कल्पना ही छापराहिया पूर्व शैलीत गाणारी पहिली महिला गायिका आहे. कल्पनापूर्वी या शैलीत केवळ पुरुष गायकांचे आवाज रेकॉर्ड गेले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
-‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
-द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?


Leave A Reply

Your email address will not be published.