Friday, December 8, 2023

ब्रेकिंग! प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शाेककळा

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून एकामागून एक स्टार्सच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. अलीकडेच टीव्ही कलाकार आदित्य सिंग राजपूत, वैभवी उपाध्याय आणि नितेश पांडे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याचवेळी, रविवारी (दि. 4 जुन)ला आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक आणि कलाकार आमिर रझा हुसैन यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले.

माध्यमातील वृत्तानुसार, आमिर (aamir raza hussain) यांचे त्यांच्या दिल्लीतील घरी शनिवारी, 3 जून रोजी निधन झाले. आमिर रझा हुसैन यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आमिर हुसैनचा शेवटचा चित्रपट 2014मध्ये प्रदर्शित झालेला ‘खुबसूरत’ होता. त्यात सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद दिसले होते. आमिर हुसैन रझाने ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ आणि ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटातही आपली क्रिएटिविटी दाखवली. एवढेच नाही, तर त्यांनी जॉय मायकल, बॅरी जॉन आणि मार्कस मर्च यांसारख्या दिग्दर्शकांसोबतही काम केले आहे.

https://twitter.com/yadavakhilesh/status/1665015168030453765?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1665015168030453765%7Ctwgr%5E0f17871d0c1f7e0d9ca10246aa8348a57897a3d4%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fentertainment%2Fbollywood-actor-director-aamir-raza-hussain-passed-away-at-the-age66-23431906.html

सपा नेते अखिलेश यादव यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत एक नाेट लिहिली आहे. ते म्हणतात, ‘महान थिएटर अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर रझा हुसैन यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रतीक होते आणि रंगभूमीच्या जगासाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी स्मरणात राहील.’ असे यादव यांनी ट्विटद्वारे आपले मत व्यक्त केले.(bollywood actor director aamir raza hussain passed away at the age 66)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री नूतन तब्बल २० वर्षे त्यांच्या आईवर होत्या नाराज; जाणून घ्या का नव्हत्या बोलत दोघी
कोरोना काळात गमावलेला जादूई आवाज,एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर होता ‘हा’ विश्वविक्रम

हे देखील वाचा