Saturday, April 20, 2024

‘ती’ छोटीशी चूक पडली महागात, अभिनेता कुशल बद्रिकेला बेदम मारहाण

सिनेसृष्टीतील कलाकारांचे अनेक खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत असतात. सध्या सोशल मीडियावर चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील कलाकार सुबोध भावेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये कुशल बद्रिकेला चांगलाच चोप मिळालेला दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊ. 

कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी अभिनयाने त्याने सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील त्याचा विनोदी अभिनय आणि भूमिका सर्वत्र चर्चेचा विषय असतो. आपल्या अभिनयाइतकाच सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचे मित्र त्याला मारहाण करताना दिसत आहेत. या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये अभिनेता संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, विजू माने हे सर्व कलाकार अभिनेता कुशल बद्रिकेला एक स्क्रिप्ट वाचायला देतात. ही स्क्रिप्ट वाचताना कुशल बद्रिके स्क्रिप्टमधील वाक्ये सोडून भलतीच वाक्ये बोलताना दिसत आहे. यामुळेच गाडीमध्येच इतर कलाकार त्याला जोरदार मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत कुशल बद्रिकेने “मला तर कळलच नाही, यांनी का मारलं ते” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.  त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही त्यांच्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी त्यांच्या मैत्रीचे कौतुकही केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

 

दरम्यान, विजू माने दिग्दर्शित ‘स्ट्रगलर साला ३’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्ट्रगलर साला ही एक विनोदी वेबसिरीज आहे. ज्याची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा –

दोनदा लग्न झालेल्या आमिर खानच्या सेक्स लाईफबद्दल करण जोहरने विचारला तो प्रश्न; अभिनेता म्हणाला, ‘तुझ्या मम्मीला…’

‘नेसली माहेरची साडी…’ खास गाण लावून अलका कुबल यांचा लंडनमध्ये सेंडऑफ, पाहा काय आहे प्रकरण

‘लायकी नसलेल्या लोकांच्या हातात आपण देश दिला…’ अभिनेता सुबोध भावेचा संताप

 

हे देखील वाचा