Sunday, April 26, 2026
Home मराठी कशी नशिबाने थट्टा आज मांडली! ललित प्रभाकरने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

कशी नशिबाने थट्टा आज मांडली! ललित प्रभाकरने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

आजच्या काळात कलाकार आणि सोशल मीडिया यांचे नाते खूपच दृढ आणि खोल आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी कलाकार वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत फॅन्ससोबत कनेक्ट राहतात. कधीकधी कलाकारांच्या या पोस्ट खूपच मजेशीर असतात. यामध्ये व्हिडिओ, फोटो, रील्स आदी अनेक गोष्टींचा समावेश असतो. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांमध्ये मराठी कलाकार देखील मागे नाही. सोशल मीडियावरील मराठी कलाकारांच्या पोस्ट देखील बॉलिवूडच्या तोडीसतोड असतात. सध्या सोशल मीडियावर मराठीमधील हँडसम अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित प्रभाकरची पोस्ट खूपच धुमाकूळ घालत आहे.

ललितने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ललित वॉशबेसिनजवळ असून, तिथे तो एका हसू येणाऱ्या संकटात अडकला आहे. मास्क घातलेला ललित एका वॉशबेसिनसमोर उभा आहे. पण नळातून काही पाणी येत नाही. नळ सुरू कसा करावा इथून त्याची सुरुवात आहे. त्यानंतर एका नळा खाली हात धरला, तर शेजारच्या बेसिनच्या नळातून पाणी यायला सुरुवात होते आणि शेजारच्या नळाखाली हात धरायला गेला की आधीच्या नळातून पाणी यायला लागते. यामुळे ललितची अवस्था इकडे जाऊ की तिकडे अशी होते. याला ललित जाम कंटाळतो. असा हा भारी व्हिडिओ आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने लिहिले, “हाथ भी नही आया और मूँह भी नही लगा.” या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला या व्हिडिओला आणि ललितच्या परिस्थितीला साजेसे असे गाणे देखील वाजत आहे, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली.’

हा व्हिडिओ पाहून फॅन्ससोबतच कलाकरांच्या देखील भन्नाट कमेंट्स त्याला येत आहे. त्याच्या मित्रांची गॅंग असणाऱ्यांपैकी अमेय वाघने लिहिले, “नळ स्टॉपच्या टॉयलेटमध्ये असंच असतं.” त्याला उत्तर देताना ललितने लिहिले, “अरे पण या नळामुळे माझा दमयंती झाल.” यासोबतच स्पृहा जोशी, मृण्मयी गोडबोले, अमृता खानविलकर, श्रेया बुगडे, हेमंत ढोमे आदी कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत.

ललितने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’या मालिकेतून त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तो ‘हंपी’,’चि व चि.सौ.का’, ‘स्माईल प्लिज’, ‘आनंदी गोपाळ’चित्रपटांमध्ये झळकला आहे. आता लवकरच तो ‘शांतीत क्रांती’या नवीन वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा