Monday, April 15, 2024

सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मराठीतील क्यूट कपल अडकलं विवाहबंधनात, पुण्यातील प्रतिशिर्डी इथे घेतले सात फेरे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम ‘अक्षय्य तृतीय’च्या दिवशी लग्न बंधनात अडकले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव मधील प्रतिशिर्डी येथे दोघांचा लग्न सोहळा पार पडला. सण 2016 मध्ये ‘दुहेरी’ या मालिकेच्या सेटवर दाेघांची मैत्री झाली, ज्यानंतर गेल्या सात वर्षांपासून दाेघेही रिलेशनशिपमध्ये हाेते. अशात अखेर त्यांनी 22 एप्रिल 2023 राेजी आपल्या नात्याचे रुपांतर प्रेमात केले. या जाेडप्याच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी उपस्थिती दर्शवली. अभिनेत्री निवेदिता यांनी ‘दुहेरी‘ या मालिकेत संकेतच्या आईची भूमिका साकरली हाेती.

अशात निवेदिता सराफ (nivedita saraf) यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संकेत आणि सुपर्णा यांच्या लग्नातील फाेटाे शेअर केले आहेत. यासाेबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझे प्रिय संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम लग्नबंधनात अडकले. माझ्यासाठी हा खरंच खूप भावनिक क्षण होता. तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वाद.”

यासाेबतच निवेदिता यांनी सुपर्णासोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “नवराई माझी लाडाची लाडाची गं…”

 

View this post on Instagram

 

A post shared by NIVEDITA_ SARAF_ FC (@nivedita.saraf)

सर्वप्रथम अभिनेता संकेत आणि सुपर्णा यांच्या घरी ग्रहमख पूजन झाले, ज्यानंतर दोघांचा मेंहदी साेहळा पार पडला. आणि त्यानंतर लग्नस्थळी दोघांना हळद लावण्यात आली. लग्नामधील अभिनेत्री सुपर्णाहिच्या लूकबद्दल बाेलायचे झाले, तर तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती आणि संकेतने लाल रंगाचे धोतर परिधान केले हाेते, ज्यात ताे प्रचंड देखणा दिसत हाेता.(marathi actor sanket pathak suparna shyam wedding photo viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अनुपम काका, पापा तुमच्यापेक्षा चांगला डान्स करायचे, पण…’ सतीश कौशिक यांच्या मुलीचा गोंडस व्हिडिओ व्हायरल

अर्चना गौतम कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड, अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

हे देखील वाचा