मंडळी आपण अनेकदा बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांबद्दल चर्चा करत असतो नाही का. या यादीत नावही चिक्कार आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की काही असेही मराठी कलाकार आहेत, ज्यांनी केवळ बॉलिवूडच नाही, तर साऊथ इंडियन चित्रपटांमध्येही काम केलंय. तसंही सध्या साऊथ चित्रपटांची क्रेज आहेच, त्यांच्या हिरो हिरोईनची, व्हिलनची नेहमीच चर्चा होत असते. तर आता आपण या व्हिडिओतून त्या मराठी कलाकारांबद्दलही जाणून घेऊ, ज्यांनी साऊथ चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली आहे.
या यादीत पहिले नाव म्हणजे सयाजी शिंदे. (sayaji shinde) अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना आपल्या अभिनयाची छाप पाडलेले सयाजी शिंदे हे साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मागणी असणारे मराठी कलाकार आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी मराठी, हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, भोजपूरी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातही त्यांचे साऊथ चित्रपटांतील व्हिलनच्या भूमिका खास गाजल्या. 2005मध्ये त्यांनी साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्यांना अनेक पुरस्कारांसाठी नामांकनही मिळालंय.
अभिनेत्री श्रृती मराठेही (shruti marathe)या यादीत आहे बरं का. तिनेही अनेक साऊथ चित्रपटंमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. तिने 2009मध्ये इंदिरा विजहा या चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तेव्हापासून ती मराठी आणि साऊथ आशा दोन्ही सिनेमाविश्वात सहजतेने वावरताना दिसते. तिने काही हिंदी प्रोजेक्टही केले आहेत.
श्रृती प्रमाणेच नेहा पेंडसे (neha pendse) ही अभिनेत्री देखील साऊथ इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. भाग्यलक्ष्मी या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या नेहा पेंडसेने मराठी बरोबर अनेक साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये काम केलंय. यात तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आशा भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. आता हिंदीतही आपली छाप पाडत असलेल्या नेहाला साऊथ इंडस्ट्रीमध्येही बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. तिने अनेक चित्रपटांत मुख्य भूमिकाही निभावल्या आहेत.
सचिन खेडेकर (sachin khedekar) यांचेही नाव या यादीत येते. त्यांनीही आपली एक वेगळी छाप साऊथ इंडस्ट्रीत पाडली आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील मोठे नाव असलेल्या सचिन खेडेकर यांनी 2005मध्ये पोलिस या चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यांनी या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारलेली. त्यांनी पुढेही काही साऊथ चित्रपटांत काम केले. त्यांनी पृथ्वीराज सुकुमारन – इंद्रजीत सुकुमारन या मल्याळी चित्रपटात काम केले. त्यांनी सुर्या, काजल आगरवाल. तारा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मात्तरम चित्रपटातही काम केलं. तसेच आल वैकुंठपुरालवो या सिनेमातही ते दिसले होते.
महेश मांजरेकर (mahesh manjrekar) हे नाव तसं भारतीय सिनेसृष्टीतील मोठे नाव. त्यातही त्यांची कामं सर्वाधिक गाजली ती मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत. पण खूप कमी जणांना माहित आहे की महेश मांजरेकर यांनी साऊथ चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. त्यांनी 2007मध्ये ओक्काडून्नाडू या तेलुगू चित्रपटांत ग्रँगस्टरची भूमिका केली होती. होमाम या तेलुगू चित्रपटातही ते इंटरनॅशनल माफिया गँग लीडरच्या भूमिकेत दिसले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव
Mother’s Day Special: नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या 9 महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश