‘नेहमी प्रमाणेच खल्लास दिसतेस’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून कलाकार झाले फिदा


‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या फिटनेसबाबत बऱ्याच चर्चा रंगवत असते. दर दिवशी वेगवेगळ्या योगा पोझेसचे वेगवेगळे पोस्ट्स शेअर करत, अभिनेत्री अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधते. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची प्लेन साडी नेसली आहे. यासोबत पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तिने कानात मोठे ईअरिंग घातले आहेत. केस मागे बांधून केसांमध्ये गुलाबी रंगाची फुले माळली आहेत. तसेच कपाळी लाल रंगाची टिकली लावली आहे. फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress amruta Khanvilkar share her photos on social media)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते तसेच कलाकार देखील सातत्याने कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर प्रसाद ओक याने कमेंट केली आहे तसेच मंजिरी ओक हिने कमेंट केली आहे की, “नेहमी प्रमाणेच खल्लास दिसतेस.” तसेच नंदिता पाटकर हिने “तुझं काय करायचं” अशी कमेंट केली आहे.” तसेच तिचे चाहते देखील तिच्या या फोटोवर सातत्याने कमेंट करताना दिसत आहेत.

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट

-‘आली गवर आली, सोनपावली आली…’, मानसी नाईकने जल्लोषात केले गौराईचे स्वागत


Leave A Reply

Your email address will not be published.