Thursday, April 18, 2024

बापरे! फॅन्सने गौतमीला विचारले, ‘तुला बॉयफ्रेंड आहे?’ अभिनेत्रीने दाखवला कुत्र्याचा फोटो, पाहा

माझा होशील ना’ आणि ‘सारे तुझ्याच साठी’ या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली अभिनेत्री गौतमी देशपांडेचे लाखो चाहते आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने घराघरात ओळख निर्मान केली आहे. गौतमी प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. गौतमी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अशाच गौतमीनी एक पोस्ट शेअर केला आहे. तिने ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्या लव्ह लाईफबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.

गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘माझा होशील ना’, ‘सारे तुझ्याच साठी’ या तिच्या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या दोन्ही मालिकांतून ती प्रत्येत घराघरात पोहोचली. गौतमीने तिच्या सौदर्याची चाहत्यांवर भूरळ घातली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

गौतमीने इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. यावेळी तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. तिला तिच्या चाहत्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही प्रश्न विचारले आहेत. गौतमी त्या प्रश्नांची अगदी मजेशीर उत्तर दिली आहेत. उत्तर देताना गौतमीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Gautami Deshpande

तिच्या चाहत्याने तिला विचार की, “तुला बॉयफ्रेंड आहे का?” यावर गौतमीने उत्तर दिल आहे. तिने त्यांच्या पाळीव श्वानाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “हो…भेटा त्याला.” गौतमीच्या या पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधलं आहे. पोस्ट पाहून चाहत्यांच्यात सध्या ती सिंगल असावी अशी चर्चा सुरू झाली आहे. तिच्या या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (Famous Marathi actress gautami deshpande sharesa secret abou the love life post a photo of her boyfriend)

अधिक वाचा- 
पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल
बाेल्ड अॅन्ड ब्युटीफुल! टिना दत्ताचा गाॅर्जियस लूक, एकादा पाहाचा

हे देखील वाचा