×

भारीच ना! ‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावर ‘झी मराठी’ या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेतील ‘आदित्य’ने घराघरात आपली ओळख निर्माण केली. हा आदित्य म्हणजेच आपला लाडका मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी होय. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून विराजसने आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र, हा अभिनेता आता एक वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती दिली होती. याच संदर्भात त्याने आता आणखी एक पोस्ट करून त्याच्या ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकबद्दल माहिती दिली आहे.

विराजसने (Virajas Kulkarni) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शुक्रवारी (२८ जानेवारी) प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. विराजसच्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर यात मुख्य अभिनेत्री म्हणून मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकणार आहे. त्याचबरोबर तिच्यासोबत आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

विराजस प्रथमच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्यासह तो एवढ्या मोठ्या कलाकारांना सोबत घेऊन काम करणार आहे, त्यामुळे यात नक्कीच काहीतरी खास असेल. यामुळे या चित्रपटाबाबत आता चाहत्यांमध्ये देखील कमालीची उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तो आता या चित्रपटातून काय कथा दाखवणार आहे, हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर याचा अंदाज चाहत्यांना येऊ शकतो.

View this post on Instagram

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13_official)

विराजसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तो अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यासह काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा शिवानी रांगोळेसोबत झाला होता. शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ही देखील अभिनेत्री असून, तिने स्टार प्रवाह या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘सांग तू आहेस का?’मध्ये काम केले आहे.

हेही वाचा-

Latest Post