Monday, June 24, 2024

जब्याच्या ‘शालू’ने घेतली मोठी भरारी, आपल्या दमदार अभिनयाने गाजवणार बॉलिवूड

नागराज मंजुळे यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमातून नवनवीन कलाकरांना इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री दिली. त्यांच्या प्रत्येक सिनेमातून मराठी इंडस्ट्रीला प्रतिभावान कलाकार मिळाले आहे. नागराज यांचा ‘फॅन्ड्री’ सिनेमा तुम्हाला आठवतच असेल. या सिनेमातून नागराज यांनी मराठी सिनेसृष्टीला शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात ही प्रतिभावान अभिनेत्री दिली. ‘फॅन्ड्री’ सिनेमात शालूची भूमिका साकारून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या राजेश्वरीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली.

‘फॅन्ड्री’ सिनेमानंतर बराच काळ राजेश्वरी सिनेमांपासून लांब होती. मात्र या काळात ती सोशल मीडियावर तुफान सक्रिय झाली आणि ती तिचे अतिशय आकर्षक, फोटो, व्हिडिओ आणि रिल्स सोशल मीडियावर पोस्टकरून लाइमलाईट्मधे आली. राजेश्वरीचे सुंदर, सालस, बोल्ड, ग्लॅमरस फोटो पाहून सर्वंच लोकं घायाळ झाले. आता पुन्हा एकदा राजेश्वरी चर्चेत आली आहे. राजेश्वरीने खूप मोठी झेप घेतली असून. या तिच्या झेपमुळे सर्वच लोकं तिचे कौतुक करताना थकत नाहीये.

राजेश्वरी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हो, प्रत्येक प्रादेशिक मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या कलाकाराचे बॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न असते. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे अपूर्णच राहते. मात्र राजेश्वरीचे हे स्वप्न “पुणे टू गोवा” या चित्रपटाच्या पूर्ण होत आहे. अमोल भगत दिग्दर्शित “पुणे टू गोवा” या चित्रपटात राजेश्वरीसोबतच आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. हा एक कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, ऍक्शन सिनेमा असणार असून या चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली आहे.

‘पुणे टू गोवा’ या चित्रपटाची कथा वास्तविक आयुष्यात संघर्ष करणार्‍या कलाकारांच्या पुणे ते गोव्या या प्रवासावर बेतलेली असणार आहे. आता या सिनेमात राजेश्वरी नक्की कोणती भूमिका साकारणार आहे?, तिच्या भूमिकेचे नाव काय असेल?, शूटिंग कधी सुरू होणार? याबद्दल अधिक माहिती लवकर समजली नसली तरी लवकरच ही माहिती मिळेल. या बातमीमुळे राजेश्वरीचे फॅन्स नक्कीच आनंदून गेले असून, तिला हिंदी चित्रपटामध्ये पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा