Friday, July 5, 2024

आर्चीच्या दिलखेचक अदा अन सोशल मीडियाजग झालं फिदा, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे नाव काढले की सर्वांच्याच डोळ्यासमोर ‘सैराट’ चित्रपटाची कथा उभी राहते. या चित्रपटाने नागराज मंजुळे यांना दिग्दर्शक म्हणून खास ओळख दिलीच त्याचप्रमाणे चित्रपटाच्या यशाने मराठी सिनेसृष्टीचेही नाव जगभरात घेतले जाऊ लागले. मात्र ‘सैराट’ चित्रपटामुळेच मराठी चित्रपट जगताला आर्चीच्या रुपाने एक सोज्वळ, करारी चेहरा मिळाला. ‘सैराट’ मधून घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) मराठी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपला अभिनय आणि घायाळ करणाऱ्या अदांमुळे तिने प्रेक्षकांची मने नेहमीच जिंकली आहेत. सध्या रिंकूचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामधील तिच्या अदांनी सोशल मीडियाला वेड लावले आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या  फोटोंंवर आणि व्हिडिओवर तिचे चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ रिंकूने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे ज्यामधील तिच्या मनमोहक अदा आणि सोज्वळ सौंदर्याची झलक पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रिंकूने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये नीम नीम गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र तिच्या या डान्समधील तिच्या अदा आणि डोळ्यांच्या इशाऱ्यावरचं चाहते फिदा झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

दरम्यान  अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’ चित्रपटातून दमदार पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देशभरात कौतुक झाले होते. त्यानंतर तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड’ सारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा