स्टायलिश लूकनंतर आता रिंकूच्या पारंपारिक लूकची रंगलीय चर्चा; एक नजर टाकाच


आपल्या अभिनयाने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी आणि खूप कमी वेळात प्रसिद्धीचे शिखर गाठणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूला तिच्या रिंकू या नावापेक्षा आर्ची या नावाने सर्वत्र ओळखतात. कारण तिच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तिला एवढी ओळख निर्माण करून दिली. तिला सर्वत्र चित्रपटातील नावानेच ओळखतात. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिची फॅन फॉलोविंग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तीचा कोणत्याही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. असाच एक फोटो रिंकूने पोस्ट केला आहे, जो वेगाने होताना व्हायरल दिसत आहे.

रिंकूने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने जांभळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तिने हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. गळ्यात सोनेरी ज्वेलरी घातली आहे. यासोबत कानात मोठे झुमके घातले आहेत. नाकात नथ, केसात गजरा घातला आहे. एकंदरीत या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. साडीमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे (Marathi actress rinku rajguru’s saree look photos viral on social media)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे चाहते तसेच कलाकार देखील कमेंट करत आहे. तिच्या फोटोवर हेमल देव हिने “खूपच सुंदर” अशी कमेंट केली आहे तर प्रार्थना बेहेरे हिने “सुंदर” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी पेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा


Leave A Reply

Your email address will not be published.