अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने पहिल्या मकरसंक्रांतीच्या हळदी- कुंकूचे फोटो केले शेअर; साडीमध्ये खुलून आलं रूप

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचे पहिले मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू केले आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


आपल्या महाराष्ट्रीयन सणांमध्ये खूपच विविधता आढळते. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात लहान – मोठा एकतरी सण आपण साजरा करतच असतो. जानेवारी महिना लागला संक्रांत हा सण आपण साजरा करतो. लहान मुलांना पतंग उडवायला मिळते म्हणून ते या सणाची वाट बघतात, तर पुरुषांना गुळपोळी मिळावी म्हणून हा सण आवडतो. मात्र, स्त्रियांना संक्रांत आली की, वेध लागतात ते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे.

सगळ्याच स्त्रिया या काळात काळ्या साड्या आणि वाण यांच्याबद्दलच बोलताना दिसतात. त्यातच जर नवीनच लग्न झालेली स्त्री असेल तर तिच्यासाठी हा सण अजूनच जास्त उत्साह आणणारा असतो. हलव्याचे दागिने घालून हळदी कुंकू करणे, आणि पहिला संक्रांत सण साजरा करणे यात अधिकच आनंद मिळतो. सामान्य स्त्रियांपासून अभिनेत्रींपर्यंत सर्वच स्त्रिया हा सण उत्साहाने साजरा करतात. मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तिचा लग्नानंतर पहिलाच संक्रांत सण साजरा केला असून, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर तिने पोस्ट देखील केले आहेत.

काळी साडी आणि त्यावर हलव्याचे सुंदर दागिने, या सर्वांमध्ये शर्मिष्ठाचे रूप अगदी खुलून आले आहे. सोबतच शर्मिष्ठाच्या नवऱ्याने तेजस देसाईने देखील हलव्याचे दागिने घातले आहे. हे दोघं या वेगळ्या पारंपरिक पोशाखात अतिशय सुरेख दिसत आहेत.

शर्मिष्ठा राऊतने ‘मन उधाण वा-याचे, ‘उंच माझा झोका’ या मालिकेत काम केले आहे. मात्र, ‘बिग बॉस मराठी’मुळे ती जास्त लोकप्रिय झाली. पहिल्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत शर्मिष्ठाने थेट फायनलपर्यंत मजल मारली होती, तर तिचा नवरा तेजस हा ‘बॉश’ कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न
-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.