Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

‘पप्पी दे पप्पी दे पारुला’, असे म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये स्मिताने काम केले, परंतु ‘बिग बॉस मराठी’ने तिला खरी ओळख दिली. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामध्ये ती तिसरी रनरअप ठरली होती. या शोमध्ये तिचा स्वभाव, टास्क खेळण्याची पद्धत, तिचा ग्लॅमर आणि डान्स सगळ्यांनीच पाहिला आहे. स्मिता ही अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. स्मिता बऱ्याच वेळा ग्लॅमरस अंदाजात दिसत असते. परंतु नुकतेच तिने तिचे मराठमोळे फोटोशूट शेअर केले आहे.

अलीकडेच स्मिताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाची पेशवाई साडी नेसली आहे. तसेच या साडीवर तिने लाल रंगाचा फुल स्लीव्ह्स ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने गळ्यात ज्वेलरी, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, केसात गजरा असा सगळा मराठमोळा साजशृंगार केला आहे. (Marathi actress smita gondkar share her traditional look photos on social media)

नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसणाऱ्या स्मिताला या मराठमोळ्या लूकमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचे हे फोटो मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत.

स्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘वाँटेड बायको’, ‘येरे येरे पैसा २’, ‘जस्ट गंमत’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘गडबड गोंधळ’, ‘माणूस एक माती’, ‘तो आणि मी’, ‘अशी फसली नानाची टांग’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबत तिने झी मराठीवरील ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत सुशांत शेलार, जयवंत वाडकर, किशोर कदम, संजय जाधव यांसारखे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

हे देखील वाचा