अनेक टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाचा डंका मिरवणारी मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी होय. उत्तम संवादकौशल्य, देहबोली आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन यामुळे स्पृहाला मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगलीच ओळख मिळाली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटासोबत तिने काही शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे. या सोबतच स्पृहा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना देखील ती खुश करत असते. अशातच तिचा एक साडीमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती नेहमी प्रमाणेच खूपच सुंदर दिसत आहे.
स्पृहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर कला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, तिने हिरव्या रंगाची साडी घातलेली आहे. तसेच तिने या साडीवर मिसमॅच लाल रंगाचे स्लिव्हलेस ब्लाउज घातलेला आहे. यासोबतच तिने हातात लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातलेल्या आहेत. तसेच तिने नोझपिन घातलेली आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या अनेक चाहत्यांना तसेच अनेक कलाकारांना देखील आवडला आहे. तिच्या या फोटोवर आदिनाथ कोठारे, ऋतुजा बागवे, सायली संजीव, सुयश टिळक, प्रसाद ओक, अन्विता फलटणकर या कलाकारांनी फायर ईमोजी तसेच हार्ट ईमोजी पोस्ट करून कमेंट केली आहे. (marathi actress spruha joshi share her green colour saree photo on instagram )
स्पृहाने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भुज: द प्राईड ऑफ इंडिया: अजय देवगणला मोठा झटका, चित्रपट झाला ऑनलाईन लीक
-कोण आहेत शहिद कॅप्टन विक्रम बात्रांच्या प्रेयसी डिंपल, का आहेत आजही अविवाहीत?