Friday, April 25, 2025
Home मराठी ‘बोले तो एकदम झक्कास!’, स्पृहा जोशीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

‘बोले तो एकदम झक्कास!’, स्पृहा जोशीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. तसेच अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

स्पृहाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. तिने या फोटोमध्ये जास्त काही मेकअप केलेला दिसत नाही. तरी देखील ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोतील तिचा खरा मेकअप तिच्या चेहऱ्यावरील स्माईल आहे. त्यामुळे ती अधिक आकर्षक दिसत आहे. (Marathi actress spruha Joshi share her photo on social media)

स्पृहाने शेअर केलेला हा सुंदर आणि सोज्वळ फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच अनेक कलाकार देखील या फोटोवर कमेंट करत आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, अन्विता फलटणकर, केतन सिंग यांनी कमेंट करून तिच्या या फोटोचे कौतुक केले आहे. सोबतच तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “बोले तो एकदम झक्कास.” तसेच इतर चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनयासोबत स्पृहाला कविता लिहिण्याची देखील आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेतही येत असते. स्पृहाने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियॅलिटी शोमध्ये स्पृहा होस्ट म्हणून कार्यरत आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे. अभिनयासोबत स्पृहा एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. तिने ‘सूर नाव ध्यास नवा’ या गायनाच्या शोचे सूत्रसंचालन केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

-‘माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी…’, म्हणत भरत जाधवने दिल्या महेश कोठारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे देखील वाचा