Saturday, June 29, 2024

‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. तसेच अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे, यासोबत तिने एक सुंदर कविता केली आहे. ती देखील सध्या जोरदार चर्चेत आहे.

स्पृहाने नुकतेच सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. स्पृहाने काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोपेक्षा फोटोचे कॅप्शन सोशल मीडियावर युजर्सला आकर्षित करत आहेत. (Marathi actress spruha Joshi share her photo on social media, her poem attract fans)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “एक वेळी कसे मिळावे मनास वेड्या सारे. लाज वाटते जनांस पण, या मनास वेड्या तीही नाही! क्षणात खुलते, क्षणात झुरते. विसावयाचे मुळी न त्याला. मुका घेऊन एक फुलाचा, पुन्हा निघाले रमवायला. भलते सलते मनात त्याच्या सहजी येते, संकोचविण, सावज अलगद हेरायाची त्याच्या हाती असते दुर्बीण. मिठीत जाऊन तुझ्या मिटावे या पलीकडले नकोच काही. काय करावे द्वाड मनाचे? असे बरळत काही बाही. खरे सांग तुझंही छळतो ना, हा जीवघेणा खेळ भयंकर? नकोच आता शोधायला मनकवडे कोड्याचे उत्तर.”

तिची ही कविता तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिच्या कवितेतील काही ओळी परत एकदा तिला मेंशन करत आहेत.

स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेतही येत असते. तिने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे. अभिनयासोबत स्पृहा एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. तिने ‘सूर नाव ध्यास नवा’ या गायनाच्या शोचे सूत्रसंचालन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जो वापरेल बेड, त्याच्यावर पडेल रेड’, खेळात अपयश आल्यानंतरही ‘बिग बॉस मराठी’चे सदस्य बनलेत कवी

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा