मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच त्यांनी त्यांच्या चित्रपट आणि गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. आता या अभिनेत्यांच्या यादीत प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशीचाही (Swapnil Joshi) समावेश आहे. स्वप्निलचा ‘बळी’ (Bali) हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर अभिनेत्याने शेअर केला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता हा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
प्रेक्षक स्वप्निल जोशीच्या ‘बळी’ या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे त्यांची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली आहे.
“कोण आहे एलिझाबेथ..?एक गूढ रहस्य उलघडायला येणार का ती..? या साऱ्या प्रश्नांसह घेऊन आलोय ‘बळी’ चा ट्रेलर आणि पोस्टर,” अशा आशयाचे कॅप्शन देऊन स्वप्निलने हे पोस्टर शेअर केले होते.
‘बळी’ या चित्रपटाचा ट्रेलर ऍमेझॉन प्राईम व्हिडिओच्या अधिकृत युट्यूब अकाऊंटवर बुधवारी (०१ डिसेंबर) प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ३० हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर ५ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्सही मिळाल्या आहेत.
चित्रपटाबद्दल थोडंसं
‘बळी’ या चित्रपटात स्वप्निल जोशीव्यतिरिक्त अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता समर्थ जाधव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. स्वप्निलच्या ‘बळी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फ्युरिया यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील गुरुवारी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
स्वप्निल जोशीच्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर त्याने ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘फ्रेंड्स’, ‘मितवा’, ‘तूहिरे’, ‘भिकारी’, ‘लाल इश्क’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’, ‘रणांगण’, ‘फुगे’, ‘मोगरा फुलला’, ‘मी पण सचिन’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
स्वप्निल जोशीने बालकलाकार म्हणून टेलिव्हिजनवर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो सन १९८८-८९ दरम्यान आलेल्या ‘लव कुश’ मध्येही झळकला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा
–‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच
-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता