Monday, May 4, 2026
Home मराठी ‘बस मोहब्बत है आप से…’, तेजस्विनी पंडितची क्यूटनेस पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं किती गोड!’

‘बस मोहब्बत है आप से…’, तेजस्विनी पंडितची क्यूटनेस पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं किती गोड!’

आपल्या सालस आणि सोज्वळ सौंदर्याने प्रत्येकाच्या मनामनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’. टीव्ही मालिकांमधून ती घराघरात पोहचली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केले. ‘तुझं नी माझं घर श्रीमंताचं’ स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेने तेजस्विनीला चांगलीच ओळख दिली. अनेक मराठी टीव्ही सीरिअल्स, चित्रपट आणि नाटकामधून आपण तेजस्विनीला साध्या आणि सोज्वळ भूमिकेत पाहिले आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे.

तेजस्विनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे बालपण नक्कीच आठवेल. तेजस्विनीने या व्हिडिओमध्ये केसांचे दोन पोनी घातले आहेत. तिने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे, तसेच छोटीशी टिकली लावलेली आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘बस मोहब्बत है आप से’ या सोशल मीडिया ट्रेंडिंग डायलॉगवर हावभाव करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Marathi actress tejswini pandit’s cute video viral on social media)

तिच्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने “क्यूटनेस ओव्हर लोडेड” अशी कमेंट केली आहे. तर सिद्धार्थ जाधवने “आय लव्ह यू टू” अशी कमेंट केली आहे. तर रेश्मा शिंदेने “सुपर क्यूट” अशी कमेंट केली आहे. यासोबत तिचे अनेक चाहते देखील सातत्याने कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने “मनीमाऊ” अशी कमेंट केली आहे.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले.‌ तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम आहे. या चित्रपटात तिने स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

निर्मात्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप; तर पत्रिका वाटप होऊनही ‘या’ कारणामुळे मोडले होते शिल्पाचे लग्न

हे देखील वाचा