Friday, September 20, 2024
Home मराठी पुण्यात पार पडणार मराठी-उर्दु गझल कार्यक्रम; ‘हे’ दिग्गज कलाकार होणार सहभागी

पुण्यात पार पडणार मराठी-उर्दु गझल कार्यक्रम; ‘हे’ दिग्गज कलाकार होणार सहभागी

गझल म्हटल की अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेक लोकांना गझल ऐकायला फार आवडतात. पुण्यात 4 ऑगस्ट रोजी इज़ाफ़त हा मराठी आणि उर्दु शेरोशायरी आणि गझलांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं स्वरुप हे अनौपचारिक असल्या कारणामुळे आजपर्यंतत रसिक श्रोत्यांचा याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अनेक मराठी आणि उर्दु गझल या वेगवेगळ्या शैलीत इथे खुलवल्या जातात. प्रत्येक शेरो-शायरीमधला विचार धरुन लिहीलेली ॲडिशनल पोयट्री ही या मैफीलीची खासियत आहे.

गप्पा, गोष्टी, हास्य विनोद करत ही मैफिल रंगणार आहे. याचमुळे गझल-शेरो-शायरी या काव्य प्रकारावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी ही एक मेजवानी असणार आहे. यामध्ये अभिनेता अभिषेक रहाळकर, गायक गौरव बुरसे आणि गायिका अवंती बपोरीकर शेरो-शायरी आणि गझल सादर करणार आहेत. द बेस पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.

आजपर्यंत हा कार्यक्रम मुंबई, ठाणे, नाशिक, नागपुर शहरांत झाला आहे. तिथे प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. २ तास चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये गझल आणि शेरो-शायरी यांची भन्नाट रेलचेल असते. याशिवाय श्रोत्यांना अतिशय प्रतिभावान अशा अभिनेते व गायक-गायिकांना भेटण्याची संधी मिळते.

प्रतिभावान अभिनेता अभिषेक रहाळकर या कार्यक्रमात शेरो-शायरी सादर करणार आहे तर प्रसिद्ध गायक गौरव बुसरे आणि गायिका अवंती बपोरीकर यात गझल सादर करणार. याशिवाय अमेय ठाकूरदेसाई (तबला), सन्मित वाघमारे (गिटार) आणि सिद्धेश गुरव(पेटी) हे साथसंगत देणार आहेत. (Marathi-Urdu Ghazal Conference to be held in Pune)

कार्यक्रम- इज़ाफ़त
दिनांक- ४ ऑगस्ट २०२३
वेळ- सायंकाळी ७ वाजून ३० मि.
ठिकाण- द बेस, पुणे
बुकिंगसाठी संपर्क क्रमांक- ९०९६९६०३४१

अधिक वाचा- 
‘बिग बाॅस’फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल
स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षें यांच मोठ भाष्य, म्हणाले, ‘मी राडे घालतो…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा