Monday, June 24, 2024

‘तो खूपच कठीण काळ होता…’, म्हणत ब्रेकअपच्या वेदनेबद्दल व्यक्त झाली सान्या मल्होत्रा

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली. सध्या ती ​​तिच्या ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिमन्यू दसानीने काम केले आहे. हा चित्रपट लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आणि प्रेमावर आधारित आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. अलीकडेच सान्या तिच्या नात्याबद्दल आणि वेदनादायक ब्रेकअपबद्दल बोलली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिने सांगितले की, ती देखील या वेदनातून गेली आहे आणि आता ती स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी काम करत आहे. 

आपल्या ब्रेकअपच्या दुःखाबद्दल बोलताना सान्या म्हणाली की, “मला वाटते की ब्रेकअप हा प्रत्येकासाठी खूप कठीण काळ असतो. पण या वेळी मला स्वतःवर काम करण्याची प्रेरणा मिळाली. माझे ब्रेकअप खूप वेदनादायी होते. चार वर्षांचे, लाँग डिस्टन्स रिलेशनशिप. हे तेव्हा सुरू झाले, जेव्हा मी दिल्लीत राहायचे. जेव्हा आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लॉकडाऊन होते आणि मी मुंबईत एकटी होते. पण मी या परिस्थितीत स्वतःला सावरले, त्याला समजून घेतले आणि स्वतःवर काम केले. माझ्यासाठी २०२० हे वर्ष स्वतःला सावरण्यासाठी चांगले होते.” (meenakshi sundareshwar actress sanya malhotra talks about her breakup and called it heart breaking)

सान्या पुढे म्हणाली, “प्रेमाबद्दल आपल्याला सर्वात मोठे खोटे बोलले जाते ते म्हणजे प्रेम हे स्वतःसाठी आवश्यक नसते. जसे आपण बॉलिवूडमध्ये पाहतो, प्रेमासाठी एक व्यक्ती दुसऱ्याच्या मागे धावत राहते. वास्तविकता हे आहे की ते तुमच्या आत आहे.”

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या क्राईम थ्रिलर चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता बॉबी देओल आणि विक्रांत मेसी देखील दिसणार आहेत. याशिवाय ती पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘हिट द फर्स्ट केस’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा