बाबो! एकदा दोनदा नव्हे, तर तीनदा घेतला सापाने सलमानचा चावा; अभिनेत्याने स्वतः सांगितलं, कशी घडली घटना


सोमवारी (२७ नोव्हेंबर) बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या काही दिवस आधी सलमान खानला साप चावल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र घाबरण्यासारखे काही नसून, अभिनेत्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. एका मुलाखतीत सलमानने या घटनेबद्दल सांगितले आहे.

वाढदिवसाच्या एक दिवस आधी साप चावल्याची कहाणी सांगताना सलमान खान म्हणाला की, “मला एकदा नव्हे तर तीन वेळा सापाने चावले.” पनवेल येथील फार्म हाऊसबाहेर माध्यमांशी संवाद साधताना सलमानने या घटनेची सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, “खोलीत एक साप घुसला होता. अशा स्थितीत मुले घाबरली, म्हणून मी साप काढण्यासाठी खोलीत गेलो. मी एक लाकूड मागितले, जे खूप लहान होते. म्हणून मी एक मोठे लाकूड मागितले आणि मग मी प्रेमाने लाकडाच्या साहाय्याने त्या सापाला उचलून बाहेर काढले. लाकडावर गुंडाळलेला साप नंतर हळू हळू माझ्या हाताकडे सरकू लागला. म्हणून मी त्या सापाला बाहेर सोडून येण्यासाठी दुसऱ्या हातात घेतले आणि लाकूड सोडून दिले.” (salman khan reveals snake bites him three times salman khan tells the whole incident)

सलमान खान पुढे म्हणाला की, “तिथे लोक जमले आणि गावकऱ्यांना समजले की हा ‘कंदारी’ प्रकारचा साप आहे. पण तिथे सुरू असलेल्या गोंगाटात सापाने मला एकदा नव्हे तर तीनदा चावा घेतला. त्यानंतर आम्ही तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. मला विषविरोधी इंजेक्शन्स देण्यात आली होती. आतापर्यंत मी सर्व प्रकारची अँटी व्हेनम इंजेक्शन्स (क्रेट, वाइपर, कोब्रा) घेतली आहेत.”

सलमानने पुढे सांगितले की, सर्पदंशाच्या घटनेनंतर त्याला ६ तास रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. साप चावल्यानंतर सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलमान म्हणाला, “चांगली गोष्ट म्हणजे हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज होते. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे अँटी व्हेनम उपलब्ध होते.” स्थानिक पोलीस आयुक्त बिपिन कुमार आणि स्थानिक आमदार संदीप नायकही तिथे पोहचले होते.

दुसरीकडे सलमान खानने वाढदिवसानिमित्त सांगितले की, ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे आणि पार्टीत सहभागी असलेल्या सर्वांची आरटीसीपीआर चाचणी करण्यात आली आहे. पुढील ४-५ दिवस तो पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये राहणार असून त्यानंतर तो ‘टायगर ३’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पुढे ‘टायगर ३’नंतर नवीन वर्षात तो ‘पठाण’ (पाहुण्याची भूमिका) करणार असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!