Monday, July 1, 2024

‘मिली’ चित्रपटातील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक आउट, टीझर पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) ही तिच्या अभिनयासोबतचं लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. जान्हवीच्या आगामी चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यातचं जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर(Boney Kapoor) असून जान्हवी आणि बोनी कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

झी स्टुडिओजने त्यांच्या सर्वात लोकप्रिय थ्रिलर ड्रामा ‘मिली’ या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर 24 वर्षांच्या नर्सिंग ग्रॅज्युएट मुलगी ‘मिली नौडियाल’ची भूमिका साकारणार आहे. टीझरच्या सुरुवातीला जान्हवी स्वतःला टेपने गुंडाळताना दिसत आहे. ती एका अशा खोलीत अडकलेली आहे. जिथलं तापमान हळूहळू कमी होत आहे. जान्हवी या खोलीतून स्वतःला बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरशिवाय सनी कौशल तिच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

दिग्दर्शन मथुकुट्टी जेवियर यांनी केले असून हा 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘हेलेन’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरशिवाय सनी कौशल तिच्या प्रियकराच्या भूमिकेत तर मनोज पाहवा तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हसलीन कौर, राजेश जैस या कलाकारांनी देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘मिली’नंतर ती लवकरच राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे. यानंतर ती वरुण धवनसोबत ‘बवाल’ चित्रपटात दिसणार आहे. जान्हवी वरुण धवनसोबत पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

खुशखबर! मिर्झापुर वेब सिरिजचा तीसऱ्या भागाला मिळाली सुटका, न्यायालयाने तक्रारीवर केले..
पत्नीनेच उघडला शालिनचा खोट्या चेहऱ्याचा मुखवटा; म्हणाली, ‘मी तुझी बेस्ट फ्रेंड….’

हे देखील वाचा